विकास कामांसाठी ४८६ झाडांची कत्तल होणार

विकास कामांसाठी ४८६ झाडांची कत्तल होणार

विकास कामांसाठी ४८६ झाडांची कत्तल होणार

मेट्रो रेल्वे, नाला रुंदीकरण, एसआरए योजना आदी विविध कामांसाठी झाडे कापणे आणि पुनरोपित करण्याबाबत काल (मंगळवार) वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीत २४ प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले. मात्र त्यापैकी १३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले तर ११ प्रस्ताव राखून ठेवण्यात आले आहेत.

यावेळी, ४८६ झाडे कापण्यास आज समितीतर्फे मंजुरी देण्यात आली. तसेच, या ४८६ झाडांच्या बदल्यात प्रत्येकी २ याप्रमाणे एकूण ९७२ झाडे पर्यायी जागेत लावण्यात येणार आहेत. यासंदर्भतील माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

आजच्या बैठकीत, ऑक्टोबर, डिसेंबर व मार्च महिन्यातील एकूण २४ प्रस्ताव मंजुरीसाठी आले होते. मात्र साधक-बाधक चर्चेअंती १३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले.


हेही वाचा – छापा टाकायला गेलेल्या NCB पथकावर ड्रग्ज पेडलरने सोडले कुत्रे


 

First Published on: March 24, 2021 9:57 AM
Exit mobile version