Corona Update: दिलासादायक! मुंबईत आज ५ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Corona Update: दिलासादायक! मुंबईत आज ५ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

कोरोना

मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील कोरोना रिकव्हरीचा रेट देखील वाढताना दिसत आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे आज मुंबईत ५ हजार ९०३ कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ५० हजार ६९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहेत. तसेच आज १ हजार ५५४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ८० हजार २६२वर पोहोचला असून ४ हजार ६८६ मृतांचा आकडा झाला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

माहितीनुसार, मुंबईत आज ७९८ रुग्ण संशयीत रुग्ण भर्ती झाले असून आतापर्यंत संशयीत रुग्ण भर्ती झाल्याचा आकडा ५५ हजार ३८२वर पोहोचला आहे. तसेच गेल्या ४८ तासांत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४३ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ५७ मृत्यूंपैकी ३१ रुग्ण पुरुष आणि २६ रुग्ण महिल्या होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ४ जणांचे वय ४० वर्षाखाली होते, ३४ जणांचे वय ६० वर्षावर होते, तर उर्वरित १९ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.

मुंबईतील रिकव्हरी रेट हा ६३ टक्के इतका आहे. १ जुलै पर्यंत ३ लाख ३९ हजार ७९६ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील दुप्पटीचा दर हा ४१ दिवस आहे. आज मुंबईतील धारावीमध्ये १९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ३०१वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकी ८४ जणांचे मृत्यू झाले आहेत. तसेच सध्या ५५१ जणांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – मुंबईसाठी हवामान विभागाचा ‘ऑरेंज’ एलर्ट


 

First Published on: July 2, 2020 8:35 PM
Exit mobile version