उल्हासनगरमधून साडेसहा लाखाची रोकड जप्त

उल्हासनगरमधून साडेसहा लाखाची रोकड जप्त

साडेसहा लाखांची रोकड जप्त

उल्हासनगर मनपाच्या आचारसंहिता पथकाने म्हारळ नाक्याजवळ इनोव्हा ह्या चारचाकी गाडीमधून तब्बल साडे सहा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोख रक्कम उल्हासनगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आचारसंहितेत निवडणूकीचे काम पारदर्शक आणि प्रभावीपणे पार पडण्यासाठी आचारसंहितेचे स्थिर पथक तयार करण्यात आले आहेत. या आचारसंहिता पथकांना शहराच्या प्रवेशद्वारांवर तैनात करण्यात आले आहे.

पोलिसांची चौकशी सुरु 

उल्हासनगर महानगर पालिकेचे दुपारच्या स्थिर पथकाचे प्रमुख संजय पवार तसेच नोडल अधिकारी युवराज भदाणे यांनी म्हारळनाका येथून इनोव्हा गाडीतून जाणाऱ्या नाडर नावाच्या इसमाला थांबवून उल्हासनगर पोलिसांच्या समक्ष त्याची अंगझडती घेतली. त्याच्याकडे साडे सहा लाख रूपयाची रोकड आढळली. त्यात ५०० रूपयाचे १० बंडल, २०० रूपयाचे ४ बंडल आणि १०० रूपयाचे ७ बंडल असे रोकड त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आली आहेत. रोकड घेऊन ही व्यक्ती आपल्या घरून उल्हासनगर एकच्या दिशेने चालला होता. याशिवाय पोलिसांनी नाडर याला देखील ताब्यात घेतले असून आचारसंहितेच्या वेळी इतकी मोठी रक्कम घेऊन ही व्यक्ती कुठे चालली होती? याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

First Published on: April 21, 2019 6:29 PM
Exit mobile version