घरमुंबईमुंबईतील तीन ठिकाणांहून ७५ लाखांची रोकड जप्त

मुंबईतील तीन ठिकाणांहून ७५ लाखांची रोकड जप्त

Subscribe

मुंबई शहर जिल्ह्यात काल, गुरुवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाव्दारे तबब्ल ७५ लाख रुपयांची संशयीत रक्कम पकडली गेली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात काल, गुरुवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाव्दारे तबब्ल ७५ लाख रुपयांची संशयीत रक्कम पकडली गेली आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे. गुरुवारी, १८ एप्रिल रोजी देशासह राज्यातही दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर ही रोकड जप्त करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाकडून तपासणी 

मुंबईतील गोल देऊळ एस. व्ही. पी. रोड या परिसरातून मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील स्थिर तपासणी पथकाने हुन्दई १२० या मोटार कारची (एम.एच.४ ई.एच.३२१२) तपासणी केली असता गाडीमध्ये प्रदिप निसार, शांतीलाल निसार आणि महेश गाला हे तीन इसम होते. त्याच्याकडे १० लाख रुपये रक्कम आढळून आली. तसेच भायखळा परिसरात तांबीट नाका, बी.जे. रोड येथे संकेत पेखळे यांच्या स्थिर तपासणी पथकाने सायंकाळी ओला अॅसेन्ट गाडी क्र. एम.एच.४३ बी.जी. २८४३ या गाडीची तपासणी केली असता, एकूण ४९ लाख ९८ हजार ५०० रुपये रक्कम आढळून आली. तर अनिल रामचंद्र मोहिते यांच्या स्थिर तपासणी पथकाने ई. एम. पाटणवाला मार्ग, राणी बाग जवळ, भायखळा येथे ईको स्पोर्ट्स फोर्ड एम.एच १२ क्यू.वाय. ३९६४ या वाहनाची तपासणी केली असता, त्यात १५ लाख रुपये आढळून आले. या तिनही प्रकरणांबाबत आयकर विभागाला कळवण्यात आले असून आयकर विभागाचे उप आयुक्त अधिक चौकशी करत आहेत. अशी माहिती ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -