CoronaVirus: अंत्यविधीला गेलेल्या विक्रोळीतील ६ जणांना कोरोनाची लागण

CoronaVirus: अंत्यविधीला गेलेल्या विक्रोळीतील ६ जणांना कोरोनाची लागण

आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयाचा ठेकेदार बदला सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत यांची मागणी

विक्रोळीमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झालेल्या एका महिलेच्या अंत्यसंस्काराला जाणे सहा जणांना महागात पडले आहे. कोरोनाबाधित या महिलेच्या मुलासह आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सोमावरी स्पष्ट झाले. त्यामुळे विक्रोळीमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान सोमवारी आणखी दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तब्बल आठ जणांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत विक्रोळीत २५ जणांना कोरोना झाला आहे.

विक्रोळीतील टागोर नगरमध्ये राहणाऱ्या महिलेची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला पण त्यानंतर करण्यात आलेल्या तिच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या महिलेचा कोणताही प्रवास केल्याचा इतिहास नव्हता. तर कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तिला कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, या महिलेच्या अंत्यसंस्काराला परिसरातील काही नागरिक आले होते. महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या अंत्यसंस्काराला आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल सोमवारी आला असून मृत महिलेच्या मुलासह सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या परिसरातील सुमारे ५० जणांना हिरानंदानी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

विक्रोळीमध्ये सोमवारी आणखी दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सोमवारी विक्रोळीमध्ये आठ कोरोनाचे रुग्ण सापडले. या दोन कोरोनाबाधितांपैकी एक रुग्ण कन्नमवार नगर २ मधील आदित्य इमारतीमध्ये तर दुसरा रुग्ण विक्रोळी गावात सापडला. रुग्ण सापडलेले परिसर व इमारत पालिकेकडून सील करण्यात आली आहे.

नगरसेवकाविरोधात नागरिकांमध्ये संताप

विक्रोळीत कन्नमवार नगर आणि टागोर नगरमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडण्याची संख्या वाढत असताना परिसरामध्ये धूर फवारणी, सॅनिटायझेशन करणे अशा बाबी करणे आवश्यक होते. परंतु धूर फवारणी, सॅनिटायझेशन करणे दूरच महिनाभरापासून नगरसेवक परिसरामध्ये फिरकालाच नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कन्नमवार आणि टागोर नगरमध्ये जवळपास १५ कोरोनाबाधित सापडले असताना आमदाराकडून काही भागामध्ये एकदा सॅनिटायझेशन केले त्यानंतर आमदारानेही दुर्लक्ष केल्याचा आरोप समाजसेवक ज्ञानदेव ससाणे यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचा सामना करण्यासाठी दिवसरात्र एक करत असताना त्यांचे आमदार तसेच नगरसेवक घरात बसले असल्याची टीकाही ससाणे यांनी केली.

हेही वाचा –

Coronavirus: भारतात १७ हुन अधिक देशांतून कोरोनाचा शिरकाव

First Published on: April 27, 2020 6:44 PM
Exit mobile version