घरCORONA UPDATECoronavirus: भारतात १७ हुन अधिक देशांतून कोरोनाचा शिरकाव

Coronavirus: भारतात १७ हुन अधिक देशांतून कोरोनाचा शिरकाव

Subscribe

पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या संस्थेने केलेल्या संशोधात हे आढळलं.

भारतीय वैज्ञानिकांनीही हवामान आणि स्थानानुसार कोरोना विषाणूचं स्वरूप बदलत असल्याचं म्हटलं आहे. वैज्ञानिक त्याच्या जीनोमचा शोध घेत आहेत. दरम्यान, वैज्ञानिकांना भारतीय रुग्णांमध्ये आतापर्यंत १७ पेक्षा जास्त देशांमधील विषाणू या संशोधनात सापडले आहेत. विषाणूचे पाच उत्परिवर्तनही आढळले आहेत. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) चे शास्त्रज्ञ म्हणतात की, भारतीय रूग्णांमध्ये आतापर्यंत आढळणारे विषाणू कोणत्याही एका देशाच्या विषाणूसारखे नाहीत. ज्या देशातून रुग्ण परत आला आहे त्या देशाचे विषाणू त्याच्यात सापडले आहेत. यावरुन हे सिद्ध होतं की चीनमधील वुहानमधून उदयास आलेल्या कोरोना विषाणूने प्रत्येक देशातील परिस्थितीनुसार स्वतःला अनुकूल केलं आहे. शास्त्रज्ञांनी केरळ, इटली, इराण या ठिकाणांहून परत आलेल्या भारतीयांची पाच गटात विभागणी केली आणि त्यांच्या २१ नमुन्यांचा अभ्यास केला.


हेही वाचा – या राज्यात कोरोनाचे फक्त १२ रुग्ण, तरीही मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन वाढवायचंय

- Advertisement -

या संशोधनात असं आढळलं आहे की प्रत्येक संक्रमित नमुन्यामधील विषाणू त्या-त्या देशानुसार भिन्न प्रतिक्रिया देत आहे. एनआयव्हीमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणाले की तिसऱ्या अभ्यासातही आम्हाला यश आलं नाही, ज्यासाठी आम्ही दोन महिने संशोधन करत होतो. तथापि, सतत देखरेखीमुळे कोरोना विषाणूचे संपूर्ण चित्र निश्चितपणे प्रकट होईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -