मुंबईकरांचा वेग बदलणार, ‘या’ रस्त्यांवर स्पीड लिमिटमध्ये बदल

मुंबईकरांचा वेग बदलणार, ‘या’ रस्त्यांवर स्पीड लिमिटमध्ये बदल

जेजे उड्डाणपुल

दक्षिण मुंबईच्या काही रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्यांसाठी वाहतुकीच्या वेगाच्या मर्यादेत बदल करण्यात आले आहेत. दक्षिण मुंबईतील जेजे उड्डाणपुलावरील वेग मर्यादा वाढविण्यात आली असून, गाड्यांचा वेग आता प्रति तास 60 किमी करण्यात आला आहे. अशाच काही इतर १० मार्गांवरील वाहतुकीच्या वेगात बदल केल्याचे वाहतूक पोसिसांकडून सांगितले जात आहे.

मुंबईच्या मार्गांवरील वाहतुकीची मर्यादा

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मुंबईच्या भागंमध्ये वाहतूकीची मर्यादा ही प्रति तास ७० किमी इतकी करण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मुंबईच्या उड्डाणपूलांवर धावणाऱ्या गाड्यांसाठी वाहतूक पोलिसांनी ‘प्रति तास गाड्यांचा वेग ८० किमी पासून ७० किमीपर्यंत कमी’ केल्याचे सांगितले आहे. यात मुंबईच्या ‘लालबाग पूल, माटुंगा येथील अरोरा पूल तसेच दादर येथील जगन्नाथ शंकर शेठ उड्डाणपूलावर देखील वेगमर्यादा प्रतितास ७० किमी करण्यात आली आहे.

‘मुंबईतील अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग हा प्रतितास जरी ७० किमी इतका असला तरीही मरीन लाईनच्या मार्गांवर मात्र, वाहनांचा वेग कमी ठेवण्यात आल्याची माहिती वाहतुक विभागातील सह आयुक्त मधुकर पांडे यांनी दिली आहे’. मरीन लाईनच्या मार्गावर प्रति तास ६५ किमीपर्यंत वेग मर्यादा ठेवण्यात आली आहे. ‘या मार्गालगत अनेक पादचाऱ्यांची वरदळ असल्याने येथील वेग कमी ठेवण्यात आला’ असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अपघातांचे प्रमाण कमी?

वाहनांच्या वेगाचा परिणामांमुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे उड्डाणपुल तसेच इतर मार्गांवरील वाहनांची वाहतुक मर्यादा कमी केल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे. मुंबईत तर २०१७ आणि २०१८ मध्ये रस्त्यांवरील अनेक अपघात झाले आहेत. जेजे उड्डाण पूलावर वाहतुकीचा वेग प्रतितास ३० किमी असल्याने २०१९ मध्ये अपघाताचे प्रमाण फार कमी होते.


 

 

First Published on: February 28, 2020 9:56 AM
Exit mobile version