Corona Update: मुंबईत २४ तासांत ७०९ नव्या कोरोनाबाधितांची वाढ!

Corona Update: मुंबईत २४ तासांत ७०९ नव्या कोरोनाबाधितांची वाढ!

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली, गेल्या २४ तासात ६०८ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. मुंबई मागील २४ तासांत ७०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १८ हजार १३० वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकी ९० हजार ९६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत आणि ६ हजार ५४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २४ तासांत मुंबईत ८७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ९० हजार ९६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.

आज मुंबईत ७७४ संशयीत रुग्ण भरती झाले असून संशयीत रुग्ण भरती होण्याचा आकडा ८३ हजार ९७३वर पोहोचला आहे. तसेच सध्या २० हजार ३२६ रुग्णांवर मुंबईत उपचार सुरू आहेत. आज झालेल्या मुंबईत कोरोना बळीपैकी ३१ पुरुष रुग्ण आणि १७ रुग्ण महिला होत्या. यामधील ४६ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १ जणाचे वय ४० वर्षा खाली होते, ४२ जणांचे वय ६० वर्षावर होते, तर उर्वरित १३ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्क्यांवर पोहोचले आहेत. ३ ऑगस्टपर्यंत ५ लाख ५९ हजार ७८७ कोविड चाचण्या झाल्या आहेत. दिलादायक बाब म्हणजे मुंबईतील दुप्पटीचा दर ८० दिवसांवर पोहोचला आहे.


हेही वाचा – Corona Update: चांगली बातमी! राज्यात आज दिवसभरात १२ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!


 

First Published on: August 4, 2020 9:40 PM
Exit mobile version