डहाणूकरवाडी ते दहिसरदरम्यानच्या अतिरिक्त मेट्रो सेवेला मुख्यमंत्री शिंदेंचा हिरवा कंदील

डहाणूकरवाडी ते दहिसरदरम्यानच्या अतिरिक्त मेट्रो सेवेला मुख्यमंत्री शिंदेंचा हिरवा कंदील

डहाणूकरवाडी ते दहिसर मेट्रो २ अ आणि आरे ते दहिसर मेट्रो ७ या मार्गिकांचा पहिला टप्पा प्रवासांसाठी सुरु झाला आहे. अशात आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डहाणूकरवाडी ते दहिसर (पूर्वी) दरम्यानच्या अतिरिक्त मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी रवाना केले आहे. याशिवाय मेट्रो २अ’ या मार्गावरील सुशोभिकरण केलेल्या डब्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे अनावरण करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी डहाणूकरवाडी येथील मेट्रो अधिकारी, चालक तसेच प्रवाशांबरोबर संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच इंधन आणि प्रवाशांच्या वेळेत बचतीसाठी मेट्रो हा एक उत्तम पर्याय आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात मेट्रोच्या विविध कामे प्रगतीपथावर असून मेट्रोचा एक- एक टप्पा पुढे जातो आहे. त्यामुळे मेट्रोद्वारे प्रवाशांचा आरामदायी, सुखकर प्रवास व्हावा, यासाठी मेट्रोने अधिक दर्जेदार गुणवत्तापूर्ण सेवा पुरविण्याच्या सूचना यावेळी दिल्या. नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीए आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास उपस्थित होते.

या मेट्रो लाईनमुळे दहिसर ईस्ट ते वेस्ट कनेक्टिव्हिटी वाढणार असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत मिळणार आहे. मेट्रोचे कोच बंगळुरुच्या बाईएमएल कंपनीचे असून प्रत्येक मेट्रोला सहा डबे आहेत. सध्या अशा 11 मेट्रो ताफ्यास असून डहाणूकरवाडीहून सकाळी 6 वाजता पहिली ट्रेन सुटेल तर शेवटची ट्रेन रात्री 10 वाजता सुटेल.


स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींसह राजकीय नेत्यांना दिल्या देशवासियांना शुभेच्छा

First Published on: August 15, 2022 11:48 AM
Exit mobile version