स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींसह राजकीय नेत्यांनी दिल्या देशवासीयांना शुभेच्छा

75th Independence Day 2022, pm narendra modi, amit shah, piyush goyal, rajnath singh, sonia gandhi, cm eknath shinde, sharad pawar, india, happy independence day

दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र यंदाचा स्वातंत्र्य दिन विशेष आहे. कारण यंदा भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण झाली आणि याच निमित्त सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहन केले. याशिवाय सोशल मीडियावरूनही देशावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, पंतप्रधान मोदींशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी दिल्या देशवासीयांना शुभेच्छा 

देशवासियांना स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद! अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी देशवासियांना 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या शूरवीरांना प्रणाम – अमित शाह

75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज भारताची संस्कृती, जीवंत लोकतांत्रिक परंपरा आणि 75 वर्षांच्या उपलब्धतेवर गर्व करण्याचा दिवस आहे. स्वत:चे आयुष्य पणाला लावत देशात स्वातंत्र्याचा सूर्योदय करणाऱ्या स्वतंत्र सैनिकांना आणि देशाच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या शूरवीरांना प्रणाम करतो. अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या शुभेच्छा

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशवासियांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा