Corona Update: मुंबईकरांनो आतातरी सावध व्हा! कोरोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी वाढ

Corona Update: मुंबईकरांनो आतातरी सावध व्हा! कोरोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी वाढ

Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत सध्या दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सातत्याने महापौर किशोरी पेडणेकर मुंबईकरांना मास्क लावण्याचे आवाहन करत आहेत. आज मुंबईतील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत मुंबईत ८९७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख १८ हजार २०७वर पोहोचली आहे. यापैकी ११ हजार ४३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी (१७ फेब्रुवारी) मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येने मागील २ महिन्यांच्या रेकॉर्ड ब्रेक केला होता. बुधवारी ७२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते, तर ३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आणि ती आठशे पार झाली. आज दिवसभरात मुंबईतील ५७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २ लाख ९९ हजार ६ कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ६ हजार ९०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा प्रमाण ९४ टक्के आहे. १३ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील कोरोना वाढीचा दर ०.१९ टक्के एवढा होता. तर मुंबईतील दुप्पटीचा दर ३७१ दिवस आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत कोरोनाच्या एकूण ३१ लाख १७ हजार २९४ चाचण्या झाल्या आहेत.


हेही वाचा – Corona Update : चेंबूरमध्ये चार इमारती सील; कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेची खबरदारी


First Published on: February 20, 2021 6:55 PM
Exit mobile version