वाढदिवस साजरा करणं पडलं महागात; संतासह दरबारातील ९ भक्त पॉझिटिव्ह!

वाढदिवस साजरा करणं पडलं महागात; संतासह दरबारातील ९ भक्त पॉझिटिव्ह!

वाढदिवस साजरा करणं पडलं महागात; संतासह दरबारातील ९ भक्त पॉझिटिव्ह!

उल्हानगरातील एका संताच्या दरबारात संताचा वाढदिवस साजरा करणे भक्तांसह संताला चांगलेच महागात पडले आहे. वाढदिवसाच्या दिवशी दरबारात हजर असणाऱ्या भक्तांसह संत महाराज असे एकूण दहा जणांचा कोरोनाची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. संत महाराज यांच्यासह ९ भक्तांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर दरबारातील इतर सेवेकरी आणि भक्तांना विलगीकरण कऱण्यात आले आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात दरबारातील दोन संतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा घडला प्रकार

उल्हासनगर या ठिकाणी असलेल्या साई वसनशहा दरबारात एका संत महाराजांचा १७ मे रोजी वाढदिवस साजरा कऱण्यात आला होता. या वाढदिवसाला राज्यातील अनेक जिल्हयातून अनके भक्त दरबारात हजर होते. या दरबारात हजर असणाऱ्या काही भक्त आणि सेवेकरी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आल्यानंतर वाढदिवसाच्या दिवशी दरबारात हजर असणाऱ्या भक्त, सेवेकरी आणि स्वतः संताची कोरोनाची चाचणी कऱण्यात आली होती. त्याच्या तपासणीचा अहवाह प्राप्त झाला असून संत महाराज यांच्यासह भक्त आणि सेवेकरी असे एकूण १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान उल्हासनगर पालिकेकडून संत महाराज यांच्यासह त्यांच्या भक्तांवर विविध रुग्णलयात उपचार सुरु आहेत. दरबारातील इतर भक्त आणि सेवेकरी यांना दरबारातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात दरबारातील दोन संतावर लॉकडाऊनच्या काळात पाच पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमवून ठाणे पोलीस आयुक्त यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी साथीचा रोग प्रतिबंधक कायदा अंतर्गत सोमवारी गुन्हा दाखल कऱण्यात आला असल्याची माहिती हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी दिली आहे.

काही आठवड्यापूर्वी उल्हासनगरातील खन्ना कंपाउंड आणि हिरा घाट या दोन ठिकाणी अंत्यविधीसाठी जमलेल्यापैकी सुमारे ४० जणांना कोरोनाच संसर्ग झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. उल्हासनगर महानगर पालिकेच्या हद्दीत कोरोनाचे एकूण ३८० रुग्ण असून दोन हजार पेक्षा अधिक जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.


परराज्यातून आलेल्यांना मजुरांना क्वारटाईन करणार नाही राज्याने घेतला निर्णय!
First Published on: June 2, 2020 7:13 PM
Exit mobile version