children vaccination : आतापर्यंत १२ ते १४ वयोगटातील ९ हजार मुलांचे लसीकरण

children vaccination : आतापर्यंत १२ ते १४ वयोगटातील ९ हजार मुलांचे लसीकरण

children vaccination : लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय! 5 वर्षांच्या मुलांना Corbevax, 6-12 वर्षांच्या मुलांना मिळणार Covaxin

मुंबई : मुंबई महापालिकेने कोविडपासून बचाव करण्यासाठी १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली. या लसीकरणाच्या अंतर्गत १६ ते २४ मार्च या सात दिवसांच्या कालावधीत ( सुट्टीचे २ दिवस वगळून) ९ हजार ७६ मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे.या लसीकरणाच्या आकडेवारीवरून सरासरी काढल्यास प्रतिदिन सरासरी १ हजार २९६ मुलांचे लसीकरण करण्यात आल्याचे निदर्शनास येते.

पहिल्याच दिवशी म्हणजे १६ मार्च रोजी लसीकरण मोहिमेला अल्प प्रतिसाद लाभला होता. त्यादिवशी फक्त १२४ मुलांचे लसीकरण करण्यात आले होते. १७ मार्च रोजी ४२५ मुलांचे, १९ मार्च रोजी १,०३० मुलांचे, २१ मार्च रोजी १,७६४ मुलांचे, २२ मार्च रोजी १,७२६ मुलांचे, २३ मार्च रोजी १,८२१ मुलांचे तर २४ मार्च रोजी २,१९७ मुलांचे असे ७ दिवसांत एकूण ९ हजार ७६ मुलांचे लसीकरण करण्यात आले. १८ व २० मार्च रोजी सार्वजनिक सुट्टीमुळे लसीकरण बंद होते. त्यामुळे १६ ते २४ मार्च या कालावधीत ७ दिवसांत प्रतिदिन सरासरी १,२९६ मूलांप्रमाणे एकूण ९ हजार ७६ मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे.

मुंबईत मार्च २०२० पासून कोविड संसर्गाला सुरुवात झाली. मात्र पालिका आरोग्य यंत्रणेने यशस्वी उपाययोजना करून कोविडच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेला परतावून लावले. मात्र आता कोविडची चौथी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांच्यामार्फत वर्तविण्यात आल्याने शासन व पालिका प्रशासन हे खडबडून जागे झाले आहेत. चीनप्रमाणेच कोविडची ही चौथी लाट भारतात, मुंबईत येऊ नये आणि त्याची मोठी झळ लहान मुलांना बसू नये, यासाठी पालिका व राज्य शासकीय यंत्रणा जागृत झाल्या असून तात्काळ उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.


राज्यातील १६ शहरांतील वीज कंपन्यांचे खासगीकरण होणार नाही; केंद्राच्या वीज संशोधन बिलासही विरोध

First Published on: March 25, 2022 9:16 PM
Exit mobile version