Corona Update – मुंबईत २४ तासात नवे ९०३ रूग्ण, तर ३६ जणांचा मृत्यू!

Corona Update – मुंबईत २४ तासात नवे ९०३ रूग्ण, तर ३६ जणांचा मृत्यू!

मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत मुंबईत ९०३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ७७ हजार १९७वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा ४ हजार ५५४ झाला आहे. तसेच २४ तासांत ६५४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ४४ हजार १७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची रिकव्हरी रेट ५७ टक्के इतका आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

मुंबईत आज भर्ती झालेले संशयीत रुग्ण ८१८ असून एकूण आकडा ५३ हजार ५३५ आहे. तसेच सध्या २८ हजार ४७३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच मुंबईत २९ जूनपर्यंत ३ लाख २८ हजार ६२१ कोरोनाच्या एकूण चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील दुप्पटीचा दर ४१ दिवसांचा आहे.


हे ही वाचा – राज्यात आज ४ हजार ८७८ नव्या रुग्णांची नोंद; २४५ मृत्यू


 

First Published on: June 30, 2020 10:07 PM
Exit mobile version