Corona Update : मुंबईत कोरोनाचे ९३१ नवे रुग्ण; तर ४९ जणांचा मृत्यू

Corona Update : मुंबईत कोरोनाचे ९३१ नवे रुग्ण; तर ४९ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! २४ तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांवर

मुंबईत गेल्या २४ तासांत ९३१ नव्या रूग्णांची नोंद झाली असून ४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ३० हजार ४१० इतकी झाली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ५ हजार १९३ जणांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या १७ हजार ६९७ इतके Active केसेस मुंबईत आहेत. तर ७ हजार २१९ जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

४९ जणांचा मृत्यू

मुंबईमध्ये ९३१ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४० जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३१ पुरुष तर १८ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ३ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३१ जण हे ६० वर्षांवरील, तर १५ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाच्या ८९२ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल १ लाख ५ हजार १९३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के आहे. तर शहरात १७ हजार ६९७ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात आज दिवसभरात ११ हजार ११९ नवे कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली असून आज तब्बल ४४२ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार आज कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आज ११ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडल्याने आतापर्यंत बाधितांचा आकडा ६ लाख १५ हजार ४७७ वर पोहोचला आहे. तर २० हजार ६८७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Corona Update : चिंताजनक! राज्यात आज कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू


 

First Published on: August 18, 2020 9:31 PM
Exit mobile version