कल्याणमध्ये आगरी कार्ड निष्प्रभ ठरलं…!

कल्याणमध्ये आगरी कार्ड निष्प्रभ ठरलं…!

खासदार निधीतून झाली कल्याण मतदारसंघातील विकास कामे

कल्याण लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे ३ लाख ४३ हजार मतांनी निवडून आले आहेत. २०१४ च्या मोदी लाटेत त्यांना अडीच हजाराचे मताधिक्य मिळाले होते. यंदा ३० हजाराचे मताधिक्य वाढले आहे. सहा विधानसभा मतदार संघापैकी कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली विधानसभा क्षेत्रात शिंदे यांच्या पारड्यात सर्वाधिक मते पडली आहेत. राष्ट्रवादीकडून आगरी कार्ड खेळलं होतं. मात्र या निवडणुकीत ते निष्प्रभ ठरल्याचे दिसून आले.

खासदार शिंदे यांच्या पारड्यात ५० टक्यांहून अधिक मतदान पडलं आहे. अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि कल्याण पूर्व ही शिवसेना भाजपची तर मुंब्रा कळवा आणि उल्हासनगर ही काँग्रेस राष्ट्रवादीची पॉकेट्स ओळखली जातात. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी आगरी कार्ड बाहेर काढलं होतं. कल्याण ग्रामीण आणि २७ गावे हा परिसरात आगरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या दोन विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादीच्या पारड्यात मते पडतील, अशी त्यांची अपेक्षा होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा अपेक्षा भंग झाला आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात सर्वाधिक १ लाख ८८ हजार मतदान झालं. त्यात शिंदे यांना सव्वा लाख मते तर पाटील यांना ४३ हजार मते पडली. त्यामुळे राष्ट्रवादीचे आगरी कार्ड चाललं नसल्याचेच दिसून येतय. मुंब्रा कळवा आणि उल्हासनगर हे राष्ट्रवादी फेव्हर ओळखले जातात. पण उल्हासनगरमध्ये पाटील यांना अवघी १५ हजार मते मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

विधानसभा निहाय मतदान

विधानसभा मतदान श्रीकांत शिंदे बाबाजी पाटील संजय हेडाव

अंबरनाथ – १ लाख ४६ हजार १७६ ८८ हजार ८१० ३१ हजार १४३ १६ हजार ९००
उल्हासनगर – १ लाख ८ हजार ७९४ ७३ हजार ३४५ १५ हजार ५६४ १२ हजार ४१५
कल्याण पूर्व – १ लाख ४३ हजार १४५ ८९ हजार २६९ २७ हजार ५५५ १७ हजार ९९७
डोंबिवली – १ लाख ४३ हजार ९३८ १ लाख १२ हजार ५३७ १९ हजार५४७ ४ हजार ७४९
कल्याण ग्रामीण – १ लाख ८८ हजार १६४ १लाख २६ हजार ६०७ ४३ हजार ८६९ ८ हजार ९१
मुंब्रा कळवा – १ लाख ५७ हजार ७३९ ६७ हजार ४५५ ७७ हजार ३३६ ५ हजार २१०

२०१९ एकूण मतदान

डॉ. श्रीकांत शिंदे (शिवसेना) – ५ लाख ५८ हजार २३ मते
बाबाजी पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) – २ लाख १५ हजार १४ मते
संजय हेडाव (वंचित बहुजन आघाडी) – ६५ हजार ३६२
नोटा – १३ हजार १२

First Published on: May 24, 2019 7:56 PM
Exit mobile version