काँग्रेस सर्वात मोठा वोट कटवा पक्ष; अबू आजमींचे टीकास्त्र

काँग्रेस सर्वात मोठा वोट कटवा पक्ष; अबू आजमींचे टीकास्त्र

आमदार अबू आझमी

सर्वांना आपल्या अधिपत्याखाली एक करु पाहणारा काँग्रेस पक्षच सर्वात मोठा वोट कटवा पक्ष असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबु आसीम आजमी यांनी केला आहे. ते सपा – बसपा आघाडीचे भिवंडी लोकसभा उमेदवार डॉ. नुरुद्दिन अन्सारी यांच्या दिवानशहा येथील प्रचार सभेत बोलत होते. या सभेस सपा प्रेदश उपाध्यक्ष अजय यादव, सरचिटणीस रिजवान मिस्टर, शहराध्यक्ष अरफात शेख, बसपा लोकसभा क्षेत्र अध्यक्ष शानेरब खान यासह असंख्य पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेसवर टीका, भाजपवर मौन

काँग्रेस सर्व देशभर मतांची विभागणी करून भाजपाला जिंकवण्याचे काम करत असून उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली यांसह असंख्य राज्यात काँग्रेसला जनाधार नसताना उमेदवार उभे केले असल्याने खरे वोट कटवा काँग्रेस असून हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल, असा आरोप त्यांनी केला. आपल्या प्रचार सभेतील संपूर्ण भाषणात भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर चकार शब्द टिका न करता भाषणाचा रोख हा काँग्रेसवर टीका करण्याकडे दिसून आला. काँग्रेसने जन्माला घातलेल्या आरएसएसकडून सध्या काँग्रेसचे नियंत्रण सुरु असून, काँग्रेसला लगाम घालण्याचे काम समाजवादी विचारांच्या पक्षाने केले असल्याचे सांगत काँग्रेस उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल यांसह असंख्य राज्यात तेथील निधर्मी पक्षांची मते खाण्यासाठी उभी असल्याचा आरोप करत, काँग्रेस ज्या शिवसेनेवर आगपाखड करत असते, त्याच शिवसेनेला भिवंडी महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पूर्ण बहुमतात असताना सत्तेत सोबत घेतले असल्याने त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आला असल्याचे शेवटी सांगितले.

साध्वीच्या विरोधात तक्रार करणार

या नंतर पत्रकारांशी साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या विधानावर बोलताना त्यांनी केलेले विधान हे प्रसिद्धीसाठी केले असून त्या विरोधात निवडणूक आयोगाकडे समाजवादी पार्टी तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले. समाजवादी पक्ष आतंकवादाकडे आतंकवाद म्हणूनच बघते. त्याला कोणत्या धर्माचे रंग देणे चुकीचे असून महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्यांची वसईमधून पकडलेल्या अभिनव भारत आणि सनातनच्या पकडल्या गेलेल्या आरोपींची जात तपासली तर मोदींचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा – 

राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो..’ नंतर हरिसाल गाव उपसरपंचाचा व्हिडिओ!

युतीचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यावर १३ गुन्हे दाखल

First Published on: April 22, 2019 8:02 PM
Exit mobile version