मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, ३ गंभीर जखमी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, ३ गंभीर जखमी

अपघात

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास खोपोलीजवळ इर्टिगा कारला अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. मोतीराम मोतीवाले व उषा मोतीवाले अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोतीराम मोतीवाले यांची सून मोहिनी यांच्यासह नात खुशी आणि नातू यांच्यावर कामोठ्यातील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

अशी घडली घटना

मोतीवाले यांचे कुटुंब हे मुंबईतील अंधेरीमधील चकाला येथील रहिवासी आहेत. हे कुटुंब धार्मिक विधीसाठी कोंडणपूर येथे गेल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील कार्यक्रम आटोपून ते ओला कारने मुंबईत परतत असताना खोपोलीजवळ हा भीषण अपघात झाला. कारने डाव्‍या बाजूच्‍या क्रॅश बॅरीयरला धडक दिल्‍यानंतर क्रॅश बॅरीयर पुढचा दिवा फोडून मागच्‍या सीटपर्यंत आरपार घुसला होता. या अपघातात ओला कारचा चालक किरण गुरसुंड हा बचावला आहे.

हेही वाचा – आज मंत्रिमंडळाचा विस्तार

First Published on: December 30, 2019 8:21 AM
Exit mobile version