राज ठाकरेंच्या गाड्यांना अपघात; तिघे जखमी

राज ठाकरेंच्या गाड्यांना अपघात; तिघे जखमी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी सकाळी त्यांच्या कुटुंबासह लोणावळ्यातील एकवीरा देवीच्या दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने परतत असताना त्यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

या गाड्यांमधील तीन जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच जाहीर सभांचा धडाका सुरू करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी ठाकरे घराण्याची कुलदेवी एकविरा आईचे सहकुटुंब दर्शन घेतले.

यावेळी राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला, मुलगा अमित, मुलगी उर्वशी आणि इतर सहकारी गाड्यांमधून प्रवास करत होते. एकविरा देवीचे दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने परतत असताना राज ठाकरे यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांचा अपघात झाला. हा अपघात नवी मुंबईतील सानापाडा येथे झाल्याचे समजते. या घटनेत शर्मिला ठाकरे यांनाही किरकोळ दुखापत झाली असून आणखी दोन जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

First Published on: October 6, 2019 6:40 AM
Exit mobile version