तोडी कंपाऊंडमधील इपिटॉम हॉटेलमध्ये विना मास्क ६७ ग्राहकांवर कारवाई

तोडी कंपाऊंडमधील इपिटॉम हॉटेलमध्ये विना मास्क ६७ ग्राहकांवर कारवाई

नाईट क्लब, हॉटेल, पब पालिकेच्या रडारवर

मुंबईमध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून तोंडाला मास्क लावणे व सुरक्षित अंतर राखणे या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु लोअर परळ येथील मथुरादास मिल कंपाऊंडमधील इपिटॉम हॉटेलमध्ये जमलेल्या ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारचे सुरक्षित अंतर राखले गेले नव्हते तसेच मास्कही लावले नव्हते. त्यामुळे या हॉटेलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वारंवार सूचना करून मास्क न लावलेल्या ६७ ग्राहकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

महापालिकेच्या जी-दक्षिण विभागाचे स्वच्छता निरिक्षक अनिल धुरी यांच्याकडे लोअर परळ येथील मथुरादास अर्थात तोडी मिल कंपाऊंडच्या आवारात असलेल्या इपिटॉम हॉटेलमध्ये रात्री साडेअकराच्या सुमारास ४०० माणसे जमा झाल्याची तक्रार प्राप्त झाली. या जमलेल्या लोकांनी मास्क लावले नव्हते, तसेच सुरक्षित अंतरही राखले गेले नव्हते. त्यामुळे महापालिका आणि ना.म. जोशी मार्ग  पोलिसांच्या पथकाने मेगा फोनवरून घोषणा करून याठिकाणी मास्क लावण्याचे तसेच सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना केल्या. मात्र, यावेळी त्यांच्या कारवाईत अडथळा आणण्याच्या प्रयत्न केला. त्यामुळे ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापन तसेच कर्मचाऱ्यांविरेाधात एफआयआर दाखल करण्यात आला.

दरम्यान महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व क्लिनअप मार्शल आणि पोलिसांच्यासोबत केलेल्या संयुक्त कारवाईत वारंवार सुचना करूनही  ६७ लोकांनी मास्क लावले नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एखाद्या हॉटेलमध्ये पोलिस आणि महापालिकेच्यावतीने झालेली ही पहिली संयुक्त कारवाई आहे.


हेही वाचा – कोरोनामुळे मरणार्‍यांमध्ये पुरुषांची संख्या जास्त

 

First Published on: December 10, 2020 8:11 PM
Exit mobile version