बंडखोरांना आता भगवा सोडून पळावे लागेल : अरविंद सावंत

बंडखोरांना आता भगवा सोडून पळावे लागेल : अरविंद सावंत

एकनाथ शिंदे यांनी बंडाळी पुकारल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी आक्रमक भुमिका घेत आमदारांविरोधात रोष व्यक्त करत आहेत. अशातच आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ‘बंडखोरांना आता भगवा सोडून पळावं लागेल. या बंडखोरांनी स्वत:हूनच परतीची दारं बंद करुन घेतली आहेत. आता कायदेशीर लढाई सुरु झाली आहे’, असा इशारा दिला आहे. (action will be taken against revolt mlas says shiv sena mp arvind sawant)

या बंडखोर आमदारांच्या पार्श्वभूमीवर आज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्यात बैठक झाली. जवळपास साडे तीन तास ही बैठक झाली. या बैठकीनंतर अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“बंडखोर आमदार कायद्याच्या कचाट्यात सापडलेत. बंडखोरांना घातपात झालं की कळेल. 4 दिवसात बंडखोरांवर कारवाई होईल”, असं सावंत यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलं. ते माध्यमांशी बोलत होते. यासह बंडखोर आमदारांना त्यांची बाडू मांडण्याची संधी दिली जाणार असल्याचंही सावंत यांनी नमूद केलं.


हेही वाचा – मुख्यमंत्री ठाकरेंनंतर आदित्य मैदानात; नगरसेवकांशी साधला ऑनलाईन संवाद

First Published on: June 24, 2022 11:43 PM
Exit mobile version