Coronavirus Updates: कोरोनाची लक्षणं आढळल्यास RT-PCR चाचणी करा, डॉक्टरांना महापालिकेचे निर्देश

Coronavirus Updates: कोरोनाची लक्षणं आढळल्यास RT-PCR चाचणी करा, डॉक्टरांना महापालिकेचे निर्देश

मुंबईसह आसपासच्या परिसरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव हळुहळू वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत घट नोंदवण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई कोरोना नियंत्रणात जरी असला तरी गेल्या दोन आठवड्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. अशातच खासगी डॉक्टरांकडे असलेल्या रुग्णामध्ये कोणतीही कोरोना सदृश्य लक्षणं आढळली तर तातडीनं रुग्णाला RT-PCR चाचणी करण्यास सांगा, असे निर्देश पालिकेकडून देण्यात आले आहे. संबंधित रुग्णांना पालिकेच्या मोफत कोविड चाचणी केंद्रावर पाठवावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

10 एप्रिल रोजी 305 वर असलेली रुग्णसंख्या आता 23 एप्रिलपर्यंत 503 वर जाऊन पोहोचली आहे. मुंबईत मार्चअखेर कोरोना रुग्णांची सर्वात कमी नोंद होत होती. दिवसाला दहा हजारपेक्षा जास्त चाचण्याही केल्या जात होत्या. मात्र गेल्या 10 दिवसांत पुन्हा एकदा अल्प प्रमाणात का होईना, रुग्णवाढीने डोक वर काढले आहे.

दरम्यान या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टरांकडे असलेल्या रुग्णामध्ये कोणतीही कोरोना सदृश्य लक्षणं आढळली तर तातडीनं रुग्णाला RT-PCR चाचणी करण्यास सांगा, असे निर्देश पालिकेकडून देण्यात आले आहे. संबंधित रुग्णांना पालिकेच्या मोफत कोविड चाचणी केंद्रावर पाठवावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलं. सद्यस्थितीत महापालिकेच्या 266 केंद्रांवर मोफच चाचणीची सोय केलेली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसचा ओमिक्रॉन व्हेरिऐंटपासूनचा धोका टाळायचा असेल, तर बुस्टर डोस घेणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं. नॅशनल इन्स्टीच्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी बुस्टर डोसची गरज व्यक्त केली.


हेही वाचा – Sindhudurg News : सिंधुदुर्गात 8 मेपर्यंत मनाई आदेश देण्यामागचे कारण काय?

First Published on: April 25, 2022 10:22 AM
Exit mobile version