अटकेतील कार्यकर्त्यांचा ‘मोदी राज’ संपवण्याचा होता कट – पोलिसांचा दावा

अटकेतील कार्यकर्त्यांचा ‘मोदी राज’ संपवण्याचा होता कट – पोलिसांचा दावा

पोलीस महासंचालक परमवीर सिंग

देशभरात कथित नक्षलींवर करण्यात आलेल्या कारवाईचे समर्थन करताना पोलिसांनी माओवाद्यांचा सरकार उलथवण्याचा मोठा डाव होता असा गौप्यस्फोट केला आहे. पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तेलुगू कवी वरवरा राव, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वर्नण गोन्साल्विस यांना अटक करण्यात आली. ही अटक अत्यंत योग्य होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला, असेही पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी सांगितले. बंदी असलेल्या नक्षली संस्थांशी संबंध ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी देशभरात नऊ ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीमध्ये हजारो संशयित कागदपत्रे आणि लॅपटॉप त्यांच्या पासवर्डसह ताब्यात घेण्यात आली असून त्याती फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

दोन वर्षांपासून आखणी एल्गार परिषदेचा सबंध

एल्गार परिषदेनंतर पुण्यातल्या विश्रामबाग पोलिसांनी केलेल्या कारवाई अनेक महत्वाचे मुद्दे समोर आलेले आहेत. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुरेंद्र गडलिंग,रोना विल्सन,
सुधीर ढवळे, यांच्यासह अन्य जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून तपासचक्र सुरू झाले. पण तपासा दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

एल्गार परिषदेला १५ लाखांचे फंडिंग

माओवाद्यांची सेंट्रल कमिटी आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींचा अगदी जवळचा सबंध होता. एवढेच नाही तर एल्गार परिषदेच्या आयोजनासाठी माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीकडून एकूण १५ लाखांचे फंडिंग सुद्धा मिळाले असल्याचे समजले आहे. सदरची रक्कम ही रोकड देण्यात आली असून ५ लाख आणि १० लाख अश्या स्वरूपाचे दोन वेळेत फंडिंग झाले असल्याचे पुरावे मिळाले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एल्गार परिषदेला जवळपास ४ हजार ते ४५०० लोकसंख्या उपस्थित होती. मात्र त्यापैकी सगळेच आरोपी नसून काही महत्त्वाचे संशयित आम्ही पाहिले. या परिषदेत प्रक्षोभक भाषणे आणि जहाल बोली पाहूनच संशयितांना आम्ही ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published on: August 31, 2018 6:40 PM
Exit mobile version