कर्ज थकवल्याने अर्जुन रामपालला न्यायालायाची नोटीस

कर्ज थकवल्याने अर्जुन रामपालला न्यायालायाची नोटीस

अभिनेता अर्जुन रामपाल

एक कोटीचे कर्ज थकवल्यामुळे बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल विरोधात न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाय.टी. एंटरटेनमेंटने रामपाल विरोधात तक्रार दाखल केली आहे. २०१८ च्या मे महिन्यात रामपाल याने एक कोटी रुपयांचे लोन घेतले असल्याचे या कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. रामापालने १२ टक्के व्याजाने ही रक्कम घेतली होती. मात्र पैसे वेळेवर न परत केल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली. वाय.टी. एंटरटेनमेंट कपंनीला पैसे परत केले असल्याचे रामपालने सांगितले आहे. रामपालने दिलेला बँकेचा चेक बाऊंस झाल्याचे कंपनीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

७.५ लाख रुपये केले होते परत

रामपाल विरोधात कलम १३८ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली. १ कोटीची रक्कम व्याजासह १४ दिवसात परत करण्याचे आदेश देण्यात आले होते. नोव्हेंबर २२ रोजी रामपालने ७.५ लाख रुपये या कंपनीला दिले होते. मात्र वेळेत पूर्ण व्याजाची रक्कम भरु शकला नाही. रामपालला एकूण १०,०५०,००० रुपये भरण्याचे आदेश मिळाले आहे.

First Published on: February 14, 2019 3:07 PM
Exit mobile version