घरमनोरंजनअर्जुन रामपालला 'पत्नी' आणि 'गर्लफ्रेंड'चा आधार

अर्जुन रामपालला ‘पत्नी’ आणि ‘गर्लफ्रेंड’चा आधार

Subscribe

या दु:खद प्रसंगी अर्जुनची पूर्व पत्नी आणि त्याची गर्लफ्रेंड एकाच ठिकाणी आल्यामुळे सोशल मिडीयावर चर्चा रंगत आहेत. 

अभिनेता अर्जुन रामपाल याची आई ग्वेन रामपाल यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. रविवारी संध्याकाळी उशीरा वरळी येथील राहत्या घरातून त्यांचा अंतयात्रा काढण्यात आली. चार वर्षांपूर्वीच ग्वेन यांना ट्रिपल निगेटीव्ह ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. गेल्याचवर्षी अर्जूनने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली आई कॅन्सरशी सुरु असलेली लढाई जिंकल्याचं जाहिर केलं होतं. मात्र, अखेर काल ही झुंज संपली आणि त्यामध्ये दुर्देवाने ग्वेन यांचा पराभव झाला. मात्र, या सगळ्यामध्ये तिथे उपस्थित कॅमेरांनी एक वेगळीच बाब कैद केली. या दु:खद प्रसंगी अर्जुन रामपालला आधार देण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड गॅबरिला हजर होती. मात्र, सोबतच अर्जुनची पूर्व पत्नीही त्याठिकाणी आपल्या मुलींसह आली होती. प्रसंग जरी दु:खद असला तरी एकाच ठिकाणी अर्जुनची पूर्व पत्नी आणि त्याची गर्लफ्रेंड आल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगत आहेत.

अर्जून रामपालची दिवंगत आई- ग्वेन रामपाल (सौ-सोशल मीडिया)

अर्जुन रामपाल आणि गॅबरिला गेल्या बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. तर, दुसरीकडे अर्जुनने आपली पूर्वपत्नी मेहर हिच्याशी याचवर्षी आपले नाते संपवले आहे. मे २०१८ मध्ये अर्जूनने मेहरपासून घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर अर्जुनच्या दोन्ही मुली मेहरसोबत राहतात.


खुशखबर: Flipkart दिवाळी धमाका; ८० टक्के सूट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -