‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, क्वारंटाईन सेंटरमधील सुविधांचा दर्जा राखा’

‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, क्वारंटाईन सेंटरमधील सुविधांचा दर्जा राखा’

'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, क्वारंटाईन सेंटरमधील सुविधांचा दर्जा राखा'

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याबरोबरच महापालिकांच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमधील सुविधांचा दर्जा राखा तसेच त्या ठिकाणावरून लोकांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या अशा सूचना राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील महापालिका आयुक्तांना दिल्या.

दरम्यान यावेळी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने बनविण्यात आलेल्या ऑनलाईन बेड अलोकेशन व ॲमेब्युलन्स बुकिंग सिस्टम ॲपचे आदित्य ठाकरे यांचे शुभहस्ते अनावरण करण्यात आले. तसेच त्यांच्यावतीने प्रत्येक महापालिकांना ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले, आदित्य ठाकरे आणि ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालय येथे कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याबाबत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ठाण्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के, खासदार राजन विचारे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र फाटक आणि ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भायंदर महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या वतीने कोरोना कोविडबाबतचे सादरीकरण करण्यात आले.

या बैठकीत बोलताना राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर चाचणीची क्षमताही वाढवण्याच्या सूचना दिल्या. ठाण्यातील कोविड रुग्णालये, विलगीकरण कक्ष, रुग्णांना पुरविण्यात येणारे वैद्यकीय व्यवस्थापन, डाॅक्टर्स आणि इतर मनुष्यबळ, रुग्णांना देण्यात येणारे भोजन, रुग्णवाहिका सेवा आदींचा आढावा घेतला. तसेच त्यांच्यावतीने प्रत्येक महापालिकांना प्रत्येकी पाच ॲाक्सिजन काॅन्सनट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महापालिकांनी मोठ्या प्रमाणात काॅन्टॅक्ट ट्रेसींग करून त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवावे अशा सूचना केल्या. क्वारंटाईन सेंटरमधून रूग्णांच्या तक्रारी येणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगितले.

First Published on: July 5, 2020 4:32 PM
Exit mobile version