जे. जे हॉस्पिटलमध्ये आता इस्त्राईल तंत्रज्ञान

जे. जे हॉस्पिटलमध्ये आता इस्त्राईल तंत्रज्ञान

जे. जे हॉस्पिटलमध्ये आता इस्त्राईल तंत्रज्ञान

महाराष्ट्रातील रुग्णसेवेतील महत्त्वाचे टप्पे आणि इस्त्राईलमधील संशोधनात्मक उपचार यांचे मिश्रण यापुढे जे.जे हॉस्पिटलमध्ये दिसणार आहे. यामुळे रुग्णसेवेला अधिक फायदा होईल. तसेच, पालिका हॉस्पिटल्समध्ये देखील या उपकरणेसाहित्यज्ञानाची देवाणघेवाण होणार असल्याची माहिती जे जे हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. इस्त्राईल दुतावास अधिकाऱ्यांनी जे. जे हॉल्पिटल्सला नुकत्याच दिलेल्या भेटीतून हे स्पष्ट होत आहे.

अद्ययावत ज्ञान आणि उपकरणांची परस्परांना मदत

आरोग्य क्षेत्रातील इस्त्राईल सरकारसोबत विविध संशोधन होण्यासाठी शिवाय वैद्यकीय सुविधांमधील अद्ययावत ज्ञान आणि उपकरणांची परस्परांना मदत व्हावी यासाठी सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती सर जे.जे समुहाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली. राज्य सरकारच्या हॉस्पिटल्ससह महापालिकेच्या हॉस्पिटल्समधील रुग्णांनाही या कराराचा फायदा होणार आहे. या कराररान्वये अत्याधुनिक यंत्रसामुग्री, उपकरणे तसेच वैद्यकीय गोष्टी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत होणाऱ्या चर्चेतून हॉस्पिटलमधील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम होण्याची आशा इस्त्राईल दुतावासाचे याकाव फ्रिंकलस्टेन यांनी व्यक्त केले आहे.


हेही वाचा – रुग्णालयातील इंजेक्शनच्या खरेदीत दोषारोप असलेल्या ९ कंपन्यांचा समावेश


 

First Published on: July 15, 2019 10:38 PM
Exit mobile version