राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यापोठापाठ संजय राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यापोठापाठ संजय राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी

दिल्लीत शरद पवार- संजय राऊत भेट, मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांचे मोठं वक्तव्य

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुन्हा एकदा धमकी जीवे मारण्याची आल्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनासुद्धा जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे. संजय राऊत यांच्यासह त्याचे लहान भाऊ सुनील राऊत यांनासुद्धा धमकी देण्यात आली आहे. 9 वाजताचा भोंगा बंद करा, अन्याथा गोळ्या घालू अशी धमकी देण्यात आली आहे. (After NCP President Sharad Pawar, Sanjay Raut has also been threatened with death)

सुनील राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, काल चार सव्वाचार वाजता तीन ते चार फोन माझ्या मोबाईलवर आले. फोनवर बोलणाऱ्या माणसाने मला आणि संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिली. महिनाभरामध्ये तुम्हाला आणि तुमच्या भावाला गोळ्या घालून स्मशानात पाठवून देईल. तुम्ही संजय राऊत यांना सांगा सकाळची जी पत्रकार परिषद होते ती बंद करायला सांगा नाहीतर तुम्हाला आणि तुमच्या भावाला संपवून टाकू, अशी धमकी दिल्याची माहीत सुनील राऊत यांनी दिली.

हेही वाचा – धमकी देणाऱ्यालाच मिळते पोलीस संरक्षण; संजय राऊतांचा थेट आरोप

संजय राऊत यांना ठार मारायची सुपारी सरकारने घेतली

सुनील राऊत म्हणाले की, संजय राऊत काल छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. त्यांनाही फोन आला होता, मात्र त्यांना कार्यक्रमात असल्यामुळे फोन उचलता नाही. त्यामुळे धमकी देणाऱ्याने मला फोन करत आम्ही तुम्हा दोघांना महिनाभरामध्ये स्मशानात पोहचवू अशाप्रकारची धमकी दिली. गेले अनेक दिवस अशा धमक्या आम्हाला वारंवार येत आहेत. आम्ही सरकारला याची जाणीव करून दिली आहे. परंतु सरकार याबाबतीत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, महाविकास आघाडीमधील प्रमुख संजय राऊत यांना ठार मारायची सुपारी सरकारने घेतली आहे, असा मोठा आरोप सुनील राऊत यांनी केला.

हेही वाचा – शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, सुप्रिया सुळेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

शरद पवार यांनाही जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर त्याने केलेले ट्वीट डिलीट केले आहे. सदर व्यक्ती ही भाजप कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

First Published on: June 9, 2023 11:49 AM
Exit mobile version