महिलेच्या अंगावर लघुशंका; आरोपी मिश्राने स्वत:च दिली कबुली, म्हणाला…

महिलेच्या अंगावर लघुशंका; आरोपी मिश्राने स्वत:च दिली कबुली, म्हणाला…

एअर इंडियाच्या विमानात एका महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याच्या घटनेने संपुर्ण देशभरात खळबळ माजली होती. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी आरोपी शंकर मिश्रा याला पोलिसांनी अटक केली आहे. शंकर मिश्रा मुंबईत राहणार असून या घटनेनंतर त्याला नोकरी करत असलेल्या कंपनीने कामावरून काढून टाकले. मात्र, या घटनेप्रकरणी आता स्वत: शंकर मिश्रा यानेच कबुली दिली आहे. शंकर मिश्रा याने पोलिसांना आपण हे कृत्य जाणून बुजून केले नसल्याचे सांगत दारूच्या नशेत असल्याने केल्याचे सांगितले. (air india peeing case yes i had naver acted intentionally was drunk accused mishra confessed to the police)

एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याची घटना २६ नोव्हेंबर २०२२ रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी मुंबईतील आरोपी शंकर मिश्रा याला अटक करण्यात आली होती. न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये घडलेल्या घटनेनंतर मिश्रा हा फरार होता. दिल्ली पोलिसांनी त्याला शनिवारी सकाळी बंगळुरूमधून अटक केली. मात्र, माझ्या मुलाला फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझा मुलगा ७२ वर्षीय महिलेशी गैरवर्तणूक करू शकत नाही, असा दावा आरोपी शंकर मिश्राच्या वडिलांनी केला होता.

या घटनेतील आरोपी शंकर मिश्रा याने पोलिसांना कबुली दिल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मिश्रा दारूच्या नशेत होता. त्यामुळे स्वत:वर नियंत्रण न राहिल्याने त्याच्या हातातून हे कृत्य झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. ‘मी जे काही केले त्या बाबत सर्व लिखित स्वरूपात दिल्याचे देखील त्याने सांगितले. त्याने लिहिलेली दोन पानी खुलासा असलेले पत्र देखील त्याने पोलिसांना दाखवले आहे. मी या प्रकरणात निर्दोष आहे असे देखील त्याने म्हटले आहे. मला फोन बेल मिळेपर्यंत बंद करण्यास सांगितले होते’, असेही शंकर मिश्रा याने सांगितले.


हेही वाचा – पंकजा मुंडेंबाबत प्रीतम मुंडेंचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, ‘सगळे घाव झेलायला ताई आणि…’

First Published on: January 8, 2023 10:34 PM
Exit mobile version