हवाई सुरक्षा शुल्कात १ जुलैपासून वाढ; विमान प्रवास महागणार

हवाई सुरक्षा शुल्कात १ जुलैपासून वाढ; विमान प्रवास महागणार

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या वतीने भारतीय हवाई सुरक्षा शुल्कात १ जुलैपासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे येणाऱ्या १ जुलै पासून हा दर १३० रुपयांवरून १५० रुपये इतका करण्यात येईल. या वाढीव शुल्कामुळे विमान प्रवास आता आणखी महागणार आहे. हे वाढवण्यात आलेले शुल्क जरी किरकोळ वाटत असले तरी, हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा हा प्रवास थोडासा महाग होणार आहे.

प्रवासी सेवा शुल्काऐवजी हवाई सुरक्षा शुल्क लागू

यासह आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरिता या शुल्कात आणखी वाढ होणार असल्याची माहिती एका अधिकृत निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या आदेशानुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी हेच शुल्क २२५.५२ रुपयांवरून ३३६.५४ रुपये करण्यात आले आहे. मात्र स्थानिक प्रवाशांकडून हेच शुल्क १५० रुपये दराने आकारले जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी जादा पैसे

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या आदेशानुसार, हवाई सुरक्षा शुल्काचे हे दर १ जुलै २०१९ रोजी १२ वाजून एक मिनिटांनी लागू होतील आणि १३० रुपये प्रवासी सेवा शुल्काऐवजी आता १५० रुपये लागू करण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना यापुढे २२५.५२ रुपयांच्या जागी ३३६.५४ रुपये भरावे लागणार आहेत.

First Published on: June 9, 2019 2:08 PM
Exit mobile version