ट्राफिकला कंटाळून अजित पवारांनी पकडली ‘डोंबिवली फास्ट’!

ट्राफिकला कंटाळून अजित पवारांनी पकडली ‘डोंबिवली फास्ट’!

अजित पवार यांनी मुंबई लोकलमधून प्रवास केला.

ट्राफिकचा त्रास जसा सामान्य माणसाला होतो, तसाच तो नेत्यांनाही होतो. याला अपवाद महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील नाहीत. कारण डोंबिवली येथे एका कार्यक्रमाला जाण्यासाठी ट्रॅाफिकचा अडथळा येवू शकतो. त्यामुळे नियोजित कार्यक्रमाला वेळेत पोहोचता येणार नाही. हा विचार करुन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून डोंबिवलीला जाणारी फास्ट लोकल पकडली आणि कार्यक्रमाला रवाना झाले.

…आणि अजित पवारांना विंडो सीट मिळाली!

गुरुवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद संपल्यानंतर अजित पवारांना मुंबईतल्या ट्रॅफिकला टाळण्यासाठी लोकलने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. सीएसटीएमवरून त्यांनी डोंबिवलीची लोकल पकडली. त्यामुळे त्यांना बसायला विंडो सीट मिळाली. गर्दीच्या वेळी सामान्य मुंबईकर देखील विंडो सीट मिळवण्यासाठी अशाच प्रकारची युक्ती करताना दिसतात. त्याचप्रमाणे यावेळी देखील बारामतीकर अजित पवार मुंबईकर झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्यासोबत यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रकाश गजभिये आणि माजी खासदार आनंद परांजपे देखील उपस्थित होते.

 

अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ट्रेनने प्रवास केला.

अजित पवार यांनी यावेळी ट्रेनमधील प्रवाशांशी देखील संवाद साधला. प्रवाशांनी यावेळी नेत्यांसोबत फोटोदेखील काढले.


वाचा अजिक पवार कुणाला असं म्हणाले – तुम्हाला जमत नाही तर घोषणा करता कशाला?
First Published on: December 27, 2018 5:19 PM
Exit mobile version