अमित ठाकरेंकडे कोणकोणती खाती? मनसेचे शॅडो कॅबिनेट जाहीर

अमित ठाकरेंकडे कोणकोणती खाती? मनसेचे शॅडो कॅबिनेट जाहीर

अमित ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १४ वा वर्धापनदिन नवी मुंबई येथे साजरा होत असताना आज शॅडो कॅबिनेट मंत्र्यांची वर्धापनदिनी घोषणा करण्यात आली. यावेळी ‘राज’पुत्र अमित ठाकरे यांना कोणती खाती देण्यात येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, अमित ठाकरे यांना माहिती व तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी देण्यात आली असून त्यासोबतच वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन आणि ग्रामविकासाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासोबतच मराठी भाषा आणि नगरविकास खात्याची देखील ते धुरा सांभाळणार आहेत. विशेष म्हणजे अमित ठाकरे आता पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन विभागावर देखील करडी नजर ठेवणार आहेत.

भाऊ ठेवणार भावाच्या खात्यावर नजर

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे असलेल्या पर्यटन खात्यावर आता अमित ठाकरे यांची करडी नजर असणार आहे. प्रत्येक हालचालीवर त्यांचे लक्ष असणार आहे. अमित ठाकरे यांच्याकडे इतर खाती देखील देण्यात आली आहेत. मात्र, पर्यटन मंत्री खात्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी दिल्यामुळे पुन्हा एकदा तू तू मै मै होणार का हे पहावे लागणार आहे.

मनसेची शॅडो कॅबिनेट

 

First Published on: March 9, 2020 1:32 PM
Exit mobile version