घरताज्या घडामोडी'अरुणोदय झाला' राज ठाकरेंनी गाणं केले ट्विट

‘अरुणोदय झाला’ राज ठाकरेंनी गाणं केले ट्विट

Subscribe

राज ठाकरेंनी 'अरुणोदय झाला' गाणं ट्विट करत सर्व मनसेच्यासैनिकांनी वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १४ वा वर्धापनदिन नवी मुंबई येथे साजरा होत आहे. वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे हा कार्यक्रम पार पडणार असून आजच्या दिवसाची सुरुवात अरुणोदयाने झाली आहे. मनसेचा वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरेंनी ‘अरुणोदय झाला’ गाणं ट्विट करत सर्व मनसेच्यासैनिकांनी वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सोहळ्या दरम्यान, मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा होण्याची देखील शक्यता आहे.

- Advertisement -

शॅडो कॅबिनेटमध्ये कोणाची लागणार वर्णी?

मनसेच्या वर्धापनदिनामित्त आज शॅडो कॅबिनेटची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामध्ये बाळा नांदगावकर – गृहमंत्री, संदीप – नगरविकास, नितीन सरदेसाई – अर्थ, राजू उबरकर – कृषी, रिटा गुप्ता – महिला बाल कल्याण, किशोर शिंदे – कायदा सुव्यवस्था, अमेय खोपकर – सांस्कृतिक मंत्री, अभिजित पानसे – शालेय शिक्षण, गजानन काळे – कामगार, योगेश परुळेकर – सार्वजनिक बांधकाम आदींची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पक्षाचा झेंडा बदलून नवीन एक नवी भूमिका घेतली आहे. तसेच आता नवी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मनसेने ही नवी रणनीती आखली आहे. त्याचप्रमाणे मनसेने पक्षवाढीसाठी अनेक प्रयत्न सुरु केले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर यंदाचा १४ वा वर्धापन दिन नवी मुंबईत साजरा केला जात आहे.

- Advertisement -

कॅबिनेट म्हणजे काय?

शॅडो कॅबिनेट म्हणजे प्रत्यक्ष सरकारच्या मंत्रिमंडळावर नजर ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेले, मात्र अधिकृत नसलेले मंत्रिमंडळ होय. या शॅडो कॅबिनेटमधील मंत्र्यांचे काम सरकारच्या मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याचे आहे. सरकारचा मंत्री चुकला किंवा त्याने काही अनधिकृत काम केले तर त्याचे ते कृत्य उघड करण्याचे काम शॅडो कॅबिनेटमधील मंत्री करतात.


हेही वाचा – मनसेचा आज नवी मुंबईत वर्धापन दिन सोहळा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -