अंधेरी सब-वे पाणी साचल्याने वाहतुकीसाठी बंद

अंधेरी सब-वे पाणी साचल्याने वाहतुकीसाठी बंद

मुंबईसह (Mumbai) आसपासच्या परिसरात पावसाचा (Rainfall) जोर वाढला आहे. गुरूवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. तसेच, पाणी साचल्यामुळे अंधेरी सब-वे (Andheri Subway) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. (Andheri Subway Closed for vehicles due to water logging)

मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अंधेरी (Andheri) परिसरात असलेला सब-वे पाणी साचल्याने (Water Logging) बंद करण्यात आला आहे. मुंबई ट्राफिक पोलीस या ट्विटर हॅण्डलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. सब-बेची वाहतूक बंद असल्याने वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यानुसार, गोखले रोड (Gokhkle Road) मार्गे ही वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याची माहिती मिळते.

हेही वाचा – पुढील ३ ते ४ दिवसांत राज्यातील ‘या’ भागात पावसाचा जोर वाढणार

पुढील ३ ते ४ दिवसांत पावसाचा जोर (Heavy Rainfall) आणखी वाढणार असल्याची शक्यात हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना (Sindhudurga District) पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट (Orenge Alert) देण्यात आला आहे.

सध्यस्थितीत राज्याच्या काही भागात पावसाने दडी मारली आहे. तर काही भागात चांगला पाऊस झाला. शिवाय, तब्बल १५ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर गडचिरोलीत चांगला पाऊस झाला. १० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चंद्रपुरात पाऊस पडला आहे. याआधी २० जून रोजी पाऊस पडला होता. या पावसामुळं उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.


हेही वाचा – ‘मेरा पानी उतरता देख…’; देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

First Published on: June 30, 2022 1:08 PM
Exit mobile version