अंगणवाडी सेविकांचं आंदोलन मागे; सेविका घेणार पंकजा मुंडेंची भेट

अंगणवाडी सेविकांचं आंदोलन मागे; सेविका घेणार पंकजा मुंडेंची भेट

दोन महिने न मिळालेल्या मानधनाबाबत अंगणवाडी सेविका आता महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेणार आहेत. मानधनाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी अंगणवाडी संघटना कृती समितीचे सदस्य १९ ऑगस्टला पंकजा मुंडे यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून देण्यात आली आहे. मानधन रखडल्याने अंगणवाडी सेविकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरले आहे. सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी असहकार आंदोलन केलं. तसंच, स्वातंत्र्यदिनी आझाद मैदानात जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला होता. पण, हे जेलभरो आंदोलन आता मागे घेण्यात आलं आहे.


हेही वाचा – अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ


सेविकांचं आंदोलन मागे

आतापर्यंत आपल्या मानधनासाठी आणि मानधनवाढीसाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आझाद मैदानात एकत्र आल्या आणि आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी, मागणी केली होती. पण, १९ ऑगस्टला महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेटीचं आश्वासन दिल्यानंतर जेलभरो आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेविकांना मानधनात केलेली वाढ अद्याप राज्य सरकारने लागू केलेली नाही. याउलट आता दोन महिने सेविकांना मानधन मिळालं नाही. यामुळे सेविकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. सेविकांच्या प्रश्नांकडे सरकारनं गांभीर्यानं पाहावं, अशी इच्छा आहे. त्यानुसार, आता महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांची दखल घेत भेटीची तारीख निश्चित केली आहे. अंगणवाडी संघटना कृती समितीचे सदस्य येत्या १९ ऑगस्टला सह्याद्रीवर पंकजा मुंडे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत अंगणवाडी सेविकांच्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या मानधनाबाबत सविस्तर चर्चा होणार आहेराजेश सिंह; महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सचिव

First Published on: August 15, 2019 6:39 PM
Exit mobile version