सुशांत सिंह राजपूत प्रकरणी CBI चौकशीची गरज नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी CBI चौकशीची गरज नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह  राजपूत (sushant singh rajput) यांनी १४ जून रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. मात्र सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याची चर्चा त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर होऊ लागली. दरम्यान, सुशांतच्या मृत्यूला एका महिना उलटला असून मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सिनेजगतातील काही लोकांची चौकशी केली आहे. आतापर्यंत २७ जणांना वांद्रे पोलिसांनी बोलावून घेत सुशांतच्या मृत्यूसंंबंधी चौकशी केली. या काळात सुशांतची प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचीदेखील पोसिलांनी चौकशी केली होती. काल रियाने सुशांतच्या केसकरता सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. त्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीची गरज नसल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले गृहमंत्री 

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस उत्तम कामगिरी करत आहेत. त्यामुळे या केससाठी सीबीआय (CBI) चौकशीची आवश्यकता नाही. मुंबई पोलिस सखोल तपासणी आणि सर्व बाजूंनी चाचपणी करत आहेत, असेही गृहमंत्री म्हणाले. त्यामुळे रिया चक्रवर्ती यांनी अमित शहा यांच्याकडे केलेल्या मागणीला राज्यातील गृहमंत्र्यांनी उत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे.

काय म्हणाली होती रिया 

रिया चक्रवर्तीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले होते की, आदरणीय अमित शहाजी, मी सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड आहे. सुशांतला जाऊन आता एक महिना झाला आहे. तसेच माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. पण, मी सुशांतला न्याय मिळावा याकरता तुमच्याकडे हात जोडून मागणी करते की, याप्रकरणी सीबीआयची (CBI) चौकशी करावी. कारण मला जाणून घ्यायचे आहे की, सुशांतने एवढे गंभीर पाऊल का उचलले आहे?

हेही वाचा –

‘भारताच्या एक इंचही जमिनीला जगातील कोणतीही ताकद हात लावू शकणार नाही’

First Published on: July 17, 2020 4:49 PM
Exit mobile version