घरताज्या घडामोडी'भारताच्या एक इंचही जमिनीला जगातील कोणतीही ताकद हात लावू शकणार नाही'

‘भारताच्या एक इंचही जमिनीला जगातील कोणतीही ताकद हात लावू शकणार नाही’

Subscribe

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लडाख दौरा केला. यावेळी त्यांनी लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेताला आणि त्यांनी लष्कराच्या जवानांना संबोधित केले. ‘जगातील कोणतीही ताकद भारताच्या एक इंचही जमिनाला हात लावू शकणार नाही’, असे कठोर शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला इशारा दिला.

यावेळी जवानांना संबोधित करताना पुढे राजनाथ सिंह म्हणाले की, ‘आम्हाला अशांतता नको तर शांतत हवी आहे. कोणत्याही देशांच्या स्वाभिमानावर भारताने कधीही हल्ला केला नाही. जर कोणी भारताच्या स्वाभिमानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सहन करणार नाही. याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. सध्या भारत आणि चीन सीमावाद सोडविण्यासाठी चर्चा सुरू आहे. पण या प्रकरणाचा तोडगा किती प्रमाणात निघेल याची मी खात्री देऊ शकत नाही.’

- Advertisement -

 

- Advertisement -

लडाखच्या दौऱ्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे देखील असणार आहेत. दोन दिवसांचा हा दौरा असणार आहे. आज संरक्षण मंत्र्यांनी लडाखला भेट दिली असून शनिवारी जम्मू-काश्मीरला भेट देतील. या अगोदर जुलै महिन्याच्या सुरुवातीस संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लडाख दौरा करणार होते. मात्र अचानक त्यांचा दौरा रद्द झाला होता. दरम्यान भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये ५ मे रोजी उफाळलेल्या संघर्षानंतर संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच लडाख दौरा आहे.


हेही वाचा – कुलगाममध्ये चकमक, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -