Sushant Sucide Case : ‘सत्याचा विजय’; अंकिता लोखंडे हिचे सूचक ट्विट

Sushant Sucide Case : ‘सत्याचा विजय’; अंकिता लोखंडे हिचे सूचक ट्विट

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास करण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत ४० हून अधिक लोकांची चौकशी मुंबई पोलिसांनी केली आहे. या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले असून आता बिहार पोलिसही या प्रकरणात सामील झाले आहेत. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात पाटणा येथे पोलिसांत तक्रार दाखल केली असून आज बिहार पोलीस मुंबईमध्ये दाखल झाली आहे. या सर्व घटनांवर सुशांतची पूर्व प्रेयसी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने Truth Win म्हणजेच सत्याचा विजय, असे ट्विट केले आहे.

काय आहे प्रकरण –

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हीच्या विरोधात सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी पाटणातील राजीव नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रिया व तिच्या कुटुंबीयांनी सुशांतचा मानसिक छळ केला. त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले, असा गंभीर आरोप के के सिंह यांनी केला आहे. यामुळे गेल्या महिन्याभरापासून सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाला वेगळी दिशा मिळाली आहे. कलम ३४१, ३४२, ३८०, ४०६, ४२०, ३०६ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आज अंकिताने सत्याचा विजय म्हटले आहे.

हेही वाचा –

Coronavirus: देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा १५ लाखांपार; २४ तासांत ७६८ मृत्यू

First Published on: July 29, 2020 1:03 PM
Exit mobile version