घरCORONA UPDATECoronavirus: देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा १५ लाखांपार; २४ तासांत ७६८ मृत्यू

Coronavirus: देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा १५ लाखांपार; २४ तासांत ७६८ मृत्यू

Subscribe

आतापर्यंत ९ लाख ८८ हजार ३० लोकं बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४८ हजार ५१२ नव्या रूग्णांची नोंद केली गेली आहे तर ७६८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ लाख ३१ हजार ६६९ वर पोहोचली आहे. त्यापैकी ५ लाख ९ हजार ४४७ अॅक्टिव्ह रूग्ण असून आतापर्यंत ९ लाख ८८ हजार ३० लोकं बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत ३४ हजार १९३ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

तिसऱ्या क्रमांकावर भारत…

दरम्यान, आतापर्यंत जगभरात १ कोटी ६८ लाखाहूनही जास्त कोरोना बाधितांची नोंद केली गेली आहेत, तर मृतांचा आकडा साडेसहा लाखांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत ६ लाख ६३ हजाराहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर या आजाराने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १ कोटी ४ लाखांपार झाली आहे. आतापर्यंत जगभरात ५७ लाख ७२ हजार ६०४ अॅक्टिव्ह रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीमध्ये अमेरिकेनंतर ब्राझील या देशाचा नंबर लागतो तर तिसऱ्या क्रमांकावर भारत सध्या येऊन पोहोचला आहे.

देशात १ कोटी ७७ लाखाहून अधिक चाचण्या!

कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या प्रमाणात पसरत आहे. त्या वेगाने आता रुग्णांच्या चाचण्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार; देशभरात २४ तासांत ४ लाख ८ हजार ८५५ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत एकूण १ कोटी ७७ लाख ४३ हजार ७४० जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.


जगात कोरोनाचा विस्फोट! आतापर्यंत १ कोटी ६८ लाख ९२ हजारांहून अधिक बाधित रूग्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -