Mansukh Hiren Murder Case: मोठी बातमी! अखेर मनसुख हिरेनच्या हत्येचा उलगडा

Mansukh Hiren Murder Case: मोठी बातमी! अखेर मनसुख हिरेनच्या हत्येचा उलगडा

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आज सर्वात मोठी घडामोड घडली ती म्हणजे माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली. शिवाय प्रदीप शर्मा यांच्यासह मनीष सोनी आणि सतीश यांना देखील अटक केली गेली. या तिघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने तिघांनाही २८ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. या सुनावणी दरम्यान अनेक दिवस चर्चेत असलेल्या मनसुख हिरेन हत्येचा अखेर उलगडा झाला.

अशी झाली मनसुख हिरेनची हत्या

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्फोटके भरून सापडलेल्या स्कोर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेन होता. अँटिलियाची घटना घडल्यानंतर काही दिवसांनी मनसुख हिरेन याची हत्या झाली. या हत्येबाबत एनआयएने असा संशय व्यक्त केला आहे की, मनसुख याची हत्या ज्या दिवशी झाली तेव्हा सचिन वाझेने त्याला फोन करून घोडबंदर रोडला बोलवले होत. त्यावेळी वाझेसोबत सुनील माने होते. दोघांसोबत मनसुख गाडीत बसला आणि त्यानंतर मनसुखला वाझे आणि माने याने इतर आरोपीकडे सोपवले. मनसुखला ज्या गाडीत बसवण्यात आले ती गाडी आरोपी मनीष सोनी चालवत होता आणि त्याच गाडीत आरोपी सतीश, संतोष शेलार आणि आनंद जाधव होते ज्यांनी मनसुखची हत्या केली असा संशय आहे. यामुळेच एनआयएने सुनील मानेच्या कोठडीची मागणी केली आहे. तसेच प्रदीप शर्मा, सुनील माने आणि इतर आरोपींचा समोरासमोर चौकशी करण्यासाठी पुन्हा एकदा कोठडीची मागणी केली आहे. ज्या तवेरा गाडीत मनसुखची हत्या झाली ती गाडी आरोपी संतोष शेलारची आहे. या गाडीच्या फॉरेन्सिक तपासणीनंतर काही महत्वाचे डीएनए मिळालेत जे या आरोपींचे असून मनसुख हिरेन प्रकरणात ते महत्वाचे पुरावे आहेत.

काय, काय सापडलं प्रदीप शर्मांच्या घरात?

आज सकाळी प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएने छापा टाकल्यानंतर एक पिस्तुल आणि जिवंत काडतुसे मिळाली आहेत. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि पिस्तुल कशासाठी असा प्रश्न NIAने कोर्टात उपस्थित केला. त्यावर शर्मा यांनी असे उत्तर दिले की, ११९७ साली हे पिस्तुल मला मिळाले होते. यासंदर्भातले सगळे पुरावे आणि कागदपत्रे माझ्याकडे आहेत. त्या पिस्तुलचे लायसन्स माझ्याकडे आहे फक्त ते मला रिन्यू करता आले नाही पण त्याची प्रोसिजर बाकी आहे.


हेही वाचा – Pradeep Sharma Arrested: ‘ही’ घटना ठरली प्रदीप शर्मांच्या अटकेच कारण


 

First Published on: June 17, 2021 5:10 PM
Exit mobile version