एपीआय रियाझ काझी पोलीस दलातून निलंबित

एपीआय रियाझ काझी पोलीस दलातून निलंबित

रियाझ काझी

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्या प्रकरणी रविवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाझ काझीला नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी (NIA) मार्फत अटक करण्यात आली. सोमवारी काझीला पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे पत्रक जारी करण्यात आले आहे. निलंबनाच्या काळात त्याला खासगी नोकरी करता येणार नाही. तसेच त्याला मुंबई सोडूनही जाता येणार नाही. काझी हा सचिन वाझेच्या निकटवर्तीयांपैकी एक मानला जाते. स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यासाठी काझीला रविवारी अटक करण्यात आली होती.

एपीआय रियाझ काझी पोलीस दलातून निलंबित

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

रियाज काझी मुंबईच्या सीआययू युनिटमध्ये पीएसआय म्हणून कार्यरत होता. अंबानीच्या घरासमोर स्कॉर्पिओ स्फोटके प्रकरणामध्ये सचिन वाझेला पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्याप्रकरणीच काझीला एनआयएने अटक केली. याआधीही अनेकदा एनआयएकडून काझीला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेजचा डीवीआर गायब करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न काझीकडून झाला होता. या चौकशीदरम्यान त्याने सरकारी माफीचा साक्षीदार बनण्याचीही तयारी दर्शवली होती. मात्र, रविवारी त्याला एनआयएने अटक केली आणि त्यामुळेच आता त्याचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे.

First Published on: April 12, 2021 2:48 PM
Exit mobile version