ओला- उबेरला कायद्याच्या कक्षेत आणा

ओला- उबेरला कायद्याच्या कक्षेत आणा

ola-uber

नियमबाह्य व्यवसाय करणार्‍या ओला- उबेरसारख्या ई टॅक्सींना कायद्याच्या कक्षेत आणण्याची मागणी मागील कित्येक दिवसांपासून सुरू आहे. मात्र यावर राज्य सरकार आणि परिवहन विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईचे रिक्षा- टॅक्सी चालक आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नोटाचा वापर करत सरकारचा विरोध करणार आहे. या संबंधीचे पत्र नुकतेच परिवहन आयुक्त कार्यलयात देण्यात आले आहे.

ओला उबेर यांसारख्या कंपन्या शहरात खुलेआम नियमबाह्य व्यवसाय करत आहे. वारंवार तक्रार करूनसुद्धा यावर महाराष्ट्र शासन आणि परिवहन आयुक्त कार्यालय या खासगी कंपन्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष व कानाडोळा केला जात आहे. परिणामी मान्यताप्राप्त टॅक्सी रिक्षा चालक व्यवसाय डबघाईला येऊन कायस्वरूपी बंद होण्याची वेळ आलेली आहेत. आज मुंबईतील टॅक्सी- रिक्षा चालकांची व्यथा अत्यंत बिकट आहे. ओला -उबेरसारख्या ई- टॅक्सी आल्यामुळे मुंबईतील काळी पिवळी टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. मान्यता प्राप्त सार्वजनिक चालकांना शासकीय बंधने व अवैध वाहतूक चालकांना कोणताही निर्बंध नाही. दीड लाख रिक्षा चालक व ७५ हजार टॅक्सी – रिक्षा चालक कुटुंबीय सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे उघड्यावर पडतील या भीतीने भविष्यात आंदोलनाचा मार्ग पत्करून, सरकारच्या कामकाजावर विरोध करण्यासाठी नोटाचा वापर करण्यात येणार आहे.

ओला-उबेर या वाहनांना कायद्याच्या कक्षेत आण्यासाठी आम्ही मागणी केली आहे. मात्र, शासनाकडून यावर जाणीवपूर्णक दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही सर्व टॅक्सी- रिक्षा चालक लोकसभा निवडणुकीत नोटाचा उपयोग शासनाच्या निषेध करू. वेळ पडल्यास मुंबईतील रिक्षा – टॅक्सी चालक सहकुटुंब रस्त्यावर सुद्धा उतरू .
के. के तिवारी – अध्यक्ष, स्वाभिमान टॅक्सी – रिक्षा युनियन

First Published on: February 1, 2019 5:49 AM
Exit mobile version