अरुण गवळीला पॅरोल मंजूर

अरुण गवळीला पॅरोल मंजूर

अरुण गवळी

कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठीने पॅरोल मंजूर केला आहे. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. पत्नी आजारी असल्याच्या कारणास्तव गवळीने 30 दिवसांची पॅरोल रजा मागितली होती. नागपूर विभागीय आयुक्तांनी अरुण गवळीचा पॅरोलचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयाची मंजूरी

अखेर उच्च न्यायालयाने गवळीला दिलासा देत पॅरोल मंजूर केला आहे. अरुण गवळी शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. याआधी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली होती.

याआधीही अनेक वेळा जेलबाहेर 

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा टप्पा पार पडल्यानंतर, म्हणजेच 30 एप्रिल 2019 रोजी गवळी पॅरोलवर मुंबईत आला होता. अरुण गवळी याआधीही 3 ते 4 वेळा जेलबाहेर आला आहे. मुलाचं लग्न, आजारपण अशी कारणं देत अरुण गवळी जेलबाहेर आला होता. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचा सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीशी संपत्तीवरुन वाद होता. त्यानंतर सदाशिव सुर्वेने अरुण गवळीच्या गँगमधील दोघांना जामसांडेकर यांची हत्या करण्याची सुपारी दिल्याचा आरोप आहे. दोघांनी सदाशिवची अरुण गवळीशी भेट घालून दिली. गवळीने हत्या करण्यासाठी 30 लाखांची रक्कम मागितली.

First Published on: February 28, 2020 7:55 AM
Exit mobile version