आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : तपासामध्ये अनेक त्रुटी असल्याचा एनसीबीचे निष्कर्ष

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : तपासामध्ये अनेक त्रुटी असल्याचा एनसीबीचे निष्कर्ष

बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान संबंधित प्रकरणामध्ये अँटी ड्रग्स एजन्सीला अनेक त्रुटी आढळल्या आहेत. एनसीबी दक्षताच्या विशेष चौकशी पथकाने आपला अहवाल दिल्ली मुख्यालयाला सादर केला आहे. आर्यन खानला ड्रग्ज केस प्रकरणी मुंबईत एनसीबीने ताब्यात घेतले होते. मागील काही महिन्यांपूर्वी हे प्रकरण घडले होते. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. (Aryan Khan drug case investigation had many flaws NCB report reveals delhi)

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पुरावे नसतानाही तपास सुरू असून, प्रकरण पुढे नेले जात आहे. या प्रकरणात 4 वेळा 65 जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून, हे लोक वारंवार जबाब बदलत होते. त्यामुळे अनेकांचे जबाब कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आले आहेत. तसेच, या प्रकरणाच्या तपासादरम्यान अशा काही गोष्टी पथकासमोर आल्या आहेत, ज्यामुळे इतर प्रकरणांच्या तपासातही त्रुटी असल्याचे दिसून आले आहे.

या सर्व प्रकरणांचा अहवाल दिल्लीला पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या तपासात जे अधिकारी कार्यरत होते ते आजही कार्यरत असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. त्यांच्या कामात अनेक उणिवा होत्या त्या या तपासादरम्यान समोर आल्या असल्याचे या अहवालात म्हटले आहे. सद्यस्थितीत या प्रकरणांमध्ये पैशांचा व्यवहार झाला आहे का, याबाबत तपास केला जात असल्याची णाहिती मिळते.

दरम्यान, याप्रकरणी आर्यन खानला क्लीन चिट देण्यात आली असून, एनसीबीला आर्यन आणि इतर 5 जणांविरुद्ध पुरेसे पुरावे सापडले नाहीत.


हेही वाचा – गोदरेज कंपनीमुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब; राज्य सरकारचा हायकोर्टात दावा

First Published on: October 18, 2022 10:54 PM
Exit mobile version