Aryan Khan Drugs case: शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी NCB कोर्टात दाखल

Aryan Khan Drugs case: शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी NCB कोर्टात दाखल

Aryan Khan Drugs case: शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी NCB कोर्टात दाखल

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आज शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (NCB) कार्यालयात दाखल झाली आहे. (pooja dadlani reached ncb office)  पूजा ददलानी ही काही कागदपत्रे घेऊन NCB कार्यालयात दाखल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिला NCB कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे पूजा सकाळीच NCB कार्यालयात हजर झाली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी पूजा ददलानीची चौकशी केली जाणार का? पूजाच्या हातात असलेले कागदपत्रातून कोणते नवे खुलासे समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

८ ऑक्टोबर आणि १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या सेशन कोर्टाच्या सुनावणीच्या वेळी देखील शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी कोर्टात हजर राहिली होती. आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला त्यावेळीस पूजा ददलानी फार भावूक झाली होती.  यावरुन पूजाचे शाहरुख आणि कुटुंबासोबत किती जवळ संबंध आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले. पूजा ददलानीचे शाहरुख खान आणि परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. आर्यन खानला अटक झाल्यापासून पूजा ददलाने शाहरुख खान आणि कुटुंबाला मोठा आधार दिला आहे.

२०१२ पासून पूजा शाहरुख खानची मॅनेजर म्हणून कारभार पाहत आहे. शाहरुख खानचे बॉलिवूडशी संबंधीत सर्व कामे, जाहिरातीपासून त्यांचा बिझेनसची संपूर्ण कामे पूजा ददलानी पाहते. शाहरुखची कोलकत्ता नाईट राइडर्सची संपूर्ण टीम देखील पूजा ददलानीच सांभाळते.

पूजा ददलानी ही एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाल्याने या प्रकरणी काही नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पूजा ददलानीने एनसीबी कार्यालयात नेलेल्या सील बंद फाईल्समधून नव्या गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

आर्यन खान ड्रग्ज व्हॉट्स अँप चॅटींग प्रकरणी अभिनेत्री अनन्या पांडे हिची चौकशी करण्यात आली. आर्यन खानसोबत ड्रग्ज संदर्भात चॅट केल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागल्याने अनन्याला पांडेला एनसीबीकडून समन्स बजावण्यात आले होते. गुरुवार आणि शुक्रवारी असे दोन दिवस अनन्या पांडेची एनसीबीकडून कसून चौकशी करण्यात आली. शुक्रवारी अनन्याची एनसीबीकडून चार तास चौकशी करण्यात आली होती. अनन्याला पुन्हा एकदा सोमवारी म्हणजेच २५ ऑक्टोबरला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले आहे.

 


हेही वाचा – Cruise Drugs Bust: ‘मला गांजा ट्राय करायचा आहे’ आर्यन – अनन्या पांडेच्या WhatsApp चॅटमधून खुलासा

First Published on: October 23, 2021 10:48 AM
Exit mobile version