घरताज्या घडामोडीCruise Drugs Bust: 'मला गांजा ट्राय करायचा आहे' आर्यन - अनन्या पांडेच्या...

Cruise Drugs Bust: ‘मला गांजा ट्राय करायचा आहे’ आर्यन – अनन्या पांडेच्या WhatsApp चॅटमधून खुलासा

Subscribe

अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरीही छापेमारी करण्यात आली. 

क्रूझ ड्रग्स प्रकरणी एनसीबीकडून २ ऑक्टोबरपासून ठिकठिकाणी छापा टाकत झाडाझडती सुरु आहेत. सध्या एनसीबीच्या रडारवर बॉलीवूड आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात बुधवारी एनसीबीने कोर्टात दाखल केलेल्या आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये एका बॉलिवूडच्या नवोदित अभिनेत्रीचं नाव असल्याचे समोर आले होते. त्यानंतर बॉलिवूडमधील नवोदित अभिनेत्री अनन्या पांडे हिच नाव आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आढळले. ड्रग्स प्रकरणी आर्यन खानच्या फोनमध्ये अनन्या पांडेसोबत व्हॉट्सअॅप चॅट मिळाल्यानंतर अभिनेत्रीला एनसीबीकडून समन्स मिळाला. आता आर्यनने अनन्याशी केलेल्या गप्पांबाबत मोठा खुलासा झाला आहे.

 गांजाबाबत अनन्याच्या आर्यनशी व्हॉट्सअॅपवर गप्पा

२०१८ ते २०१९ दरम्यान अनन्या पांडेच्या आर्यन खानशी गांजाबाबत व्हॉट्सअॅपवर गप्पा झाल्या. अनन्याचे दोन्ही फोन एनसीबीने जप्त केले. जेव्हा तिला याबाबतीत एनसीबीकडून प्रश्न विचारले गेले तेव्हा ती गोंधळली आणि आपल्याला काही आठवत नाही असे सांगून प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अनन्याच्या एका चॅटमध्ये ती आर्यनला सांगते की, ‘तिने यापूर्वी गांजा ट्राय केला आहे, पण आता मला पुन्हा गांजा ट्राय करायचा आहे’

- Advertisement -

अनन्याने उत्तर दिले – मी व्यवस्था करीन

आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्या गप्पांमध्ये एका ठिकाणी आर्यन अनन्याशी गांजाबद्दल बोलत होता. आर्यन विचारत होता गांजाबाबत काही जुगाड होऊ शकतो ? अनन्याने उत्तर दिले – मी व्यवस्था करीन. एनसीबीने अनन्याला ही व्हॉट्सअॅप चॅट दाखवून प्रश्न विचारला असता, अनन्याने उत्तर दिले की, मी मस्करी करत होते.

एनसीबीने चॅटबाबत सतत अनन्याची विचारपूस केली असली तरी तिचे उत्तर असे होते की आर्यनसोबत जे काही संभाषण झाले ते सिगारेटबद्दल होते. आम्ही कोणत्याही ड्रग्सबाबत बोललो नाही.  अनन्याला ड्रग्ज घेतले आहे का? , अशी विचारणा केली असता,अभिनेत्रीने स्पष्टपणे नकार दिला.

- Advertisement -

काल (गुरुवारी) शाहरुख खानने आर्थर रोड तुरुंगात जाऊन मुलगा आर्यन खानची भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच एनसीबीच्या पथकाकडून बॉलिवूडची अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरीही छापेमारी करण्यात आली.  अनन्या पांडेला चौकशीसाठी एनसीबीने समन्स बजावले होते.मात्र अजूनही एनसीबीला अनन्याबाबत ठोस पुरावा मिळाला नाही.त्यामुळे एनसीबी बॉलिवूडमधील आणखी कोण-कोणत्या बड्या चेहऱ्यांवर कारवाई करणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.


हे ही वाचा – Cruise Drugs Case: WhatsApp चॅटमध्ये सहभागी २४ वर्षीय ड्रग्ज पेडलरला NCBने घेतलं ताब्यात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -