मोदींवर बोलण्याची तुमची औकात नाही – आशिष शेलार

मोदींवर बोलण्याची तुमची औकात नाही – आशिष शेलार

आशिष शेलारांची राज ठाकरेंवर टीका

शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त बोलतेवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर तोंडसुख घेतले. ‘लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुलवामा हल्ल्याचे राजकारण होत असून, जशी निवडणूक जवळ येईल तसा पुन्हा एकदा पुलवामा सारखा दहशतवादी हल्ला केला जाईल’, असं धक्कादायक वक्तव्य राज यांनी केलं. दरम्यान, या मुद्द्यावरुन भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. ‘राज ठाकरेचं कालचं भाषण निव्वळ टाईमपास होता’, असं शेलार यांनी म्हटलंय. ‘काल टाईमपास झाला आज आपण सिरिअस काम करु,’ असंही शेलार यावेळी म्हणाले. आज मुंबईच्या शडमुखानंद सभागृता सुरु असलेल्या भाजप मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.

आशिष शेलार म्हणाले…

कार्यक्रमादरम्यान बोलताना शेलार म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस राज्यातले विषय बोलतील, सुषमा स्वराज केंद्रातले विषय बोलतील पण मी ठरवल मी गल्लीतल्या लोकांवर बोलेन.’ ‘काल राज ठाकरेंचे जे भाषण झाले त्याचे वर्णन करायचे झाल्यास मला प्रमोद महाजन यांची आठवण होते. खोट्याशिवाय जगायचं नाही अशी या सगळ्याच विरोधकांची भूमिका असते. मात्र, कोण कोणावर काय बोलतो, आपण जे बोलतो ते लोकांना पचेल तरी काय याचे यांना भान नाही. यांना ठाणे मुंबईच्या वादात बोलवलं जात नाही आणि हे भारत-पाक सीमेवर बोलतातय. मोदींवर बोलण्याची तुमची औकात नाही. तेव्हाही मोदींच्या मागे लपून मते घेतली. तुमच्या टीकेला भीक घालत नाही’, अशा शब्दातं शेलार यांनी राज ठाकरेंसह अन्य विरोधकांना टोला हाणला.


मुख्यमंत्री राज ठाकरेंना बारामतीचा पोपट म्हणाले!

‘अशोक चव्हाण म्हणाले आम्ही जागा देणार नाही तेव्हा राष्ट्रवादीचे फोन दादरला फोन लावतात. मग काय पोपट सुरू होतो. फक्त एक जागा मिळवण्यासाठी तुम्ही जवानाच्या कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित करतात. लोकसभेच्या रिंगणात याल तेव्हा पुढच्या गोष्टी बोलू’, असंही शेलार यावेळी म्हणाले.

First Published on: March 10, 2019 2:30 PM
Exit mobile version