घरमुंबईराज ठाकरे बारामतीचे पोपट; त्यांच्या स्क्रिप्ट्स बारामतीहून येतात - मुख्यमंत्री

राज ठाकरे बारामतीचे पोपट; त्यांच्या स्क्रिप्ट्स बारामतीहून येतात – मुख्यमंत्री

Subscribe

मुंबईत भाजपच्या महिला मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर खोचक शब्दांमध्ये टीका करत 'राज ठाकरे हे बारामतीचे पोपट आहेत', असं वक्तव्य केलं आहे.

राज ठाकरे म्हणजे बारामतीचा पोपटच असून त्यांच्या भाषणांच्या स्क्रीप्ट या बारामतीहूनच येतात. बारामतीला पोपटांची कमी पडली, की ते नव्या पोपटाच्या शोधात असतात. सूर्याकडे पाहून थुंकलं, की थुंकी आपल्याच तोंडावर पडते. आणि मोदी हे सूर्यासारखे आहेत, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. रविवारी भाजपच्या महिला मेळाव्याचं मुंबईमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या मेळाव्याला केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

राज ठाकरेंच्या पक्षात नॉन प्लेईंग गडी नाही!

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर उपरोधिक टीका देखील केली. ‘राज ठाकरे हे कलाकार आहेत. त्यामुळे त्यांचं काम हे दिलेली स्क्रीप्ट वाचणं एवढंच आहे. बारामतीचे पोपट संपले की हे बोलायला लागतात. ज्यांना एकही नगरसेवक आणि आमदार आणता आला नाही, त्यांचं कोण ऐकणार? त्यांच्या पक्षात एकही नॉन प्लेईंग किंवा १२वा गडी नाही. त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

- Advertisement -

आशिष शेलारांनी काढली राज ठाकरेंची औकात!

मोदींचं केलं भरपूर कौतुक

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचं मन भरून कौतुक केलं. ‘आधीच्या सरकारच्या काळात जेव्हा भारतात बॉम्बहल्ले झाले, तेव्हा आम्ही त्याचा निषेध केला. मात्र, त्या सरकारने युनोमध्ये जाऊन सांगितलं आमच्या शेजाऱ्यांना समजवा. पण आमच्या काळात हल्ला झाला, तेव्हा आम्ही पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. आपल्या सेनेमध्ये ताकद आणि हिंमत होती. पण देशाच्या नेतृत्वामध्ये हिंमत नव्हती. पण मोदींनी हे करून दाखवलं आहे’, असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘भाजप निवडणुकांसाठी पूर्ण तयार’

‘लोकसभा निवडणुकांचा आज बिगुल वाजणार आहे. पण भाजप पूर्णपणे तयार असल्याचं दाखवणारा हा मेळावा आहे. गेल्या ५० वर्षांत दे घडलं नाही, ते या ५ वर्षांत घडलं. ‘गरिबी हटाव’चे नारे अनेकांनी दिले. पण मोदी सरकारने गरिबी हटावचं काम केलं. देशातल्या योजना कधीही सामान्यांपर्यंत पोहोचतच नव्हत्या. काँग्रेसचे चेले मधल्यामध्ये सगळं खाऊन टाकायचे. मात्र मोदींनी आता एक रुपयावरही डल्ला मारायचा स्कोप ठेवलेला नाही’, असं म्हणत यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.


राज ठाकरे पुलवामावर पुन्हा बोलले!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -