गर्दीतील लोकांवर गुन्हे दाखल मात्र गबरुवर कारवाई नाही, शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा

गर्दीतील लोकांवर गुन्हे दाखल मात्र गबरुवर कारवाई नाही, शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा

गर्दीतील लोकांवर गुन्हे दाखल मात्र गबरुवर कारवाई नाही, शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा

पूजा चव्हाणने पुण्यातील राहत्या घराच्या इमारतीवरुन आत्महत्या केली, परंतु पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात अडकलेले वनमंत्री संजय राठोड हे तब्बल १५ दिवसांनंतर जनतेसमोर येऊन आपली भूमिका मांडली आहे. वनमंत्री संजय राठोड सोमवारी(२४ फेब्रुवारी) पोहरादेवी मंदिरात हजर राहत शक्तिप्रदर्शन केले. याच शक्तिप्रदर्शनात नियामांचे उल्लंघन झाल्यामुळे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना काळात गर्दी केल्यामुळे १० हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. परंतु गर्दी जमवणाऱ्या गबरुवर कारवाई नाही असे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

पोहरादेवी येथील शक्तिप्रदर्शनामुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. नियामांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी आणि अलोट गर्दी झाल्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन आणि पोलिसांच्या नोटीसीला केराची टोपली दाखवत संजय राठोड यांचे बंजारा समाजाचे समर्थक पोहरादेवी परिसरात जमले होते. कोरोना फोफावत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गर्दी न करण्याचे आवाहन केलंय या आवाहनालाही जुमानले नाही आहे. गर्दी केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार १० हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.


हेही वाचा : पोहरादेवी गर्दीप्रकरणी आपला माणूस असेल तरी कारवाई होणार – संजय राऊत


आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, कोरोना काळात गर्दी केली म्हणून १० हजार जणांवर गुन्हा दाखल करु पण गर्दी जमवणाऱ्या एका ‘गबरुवर’ कारवाई नाही? एका भगिनीचा जीव गेला, महाराष्ट्र हळहळला पण मा.मुख्यमंत्री बोलणार नाहीत? महाविकास आघाडी सरकारचे महाराष्ट्रात सुरु आहे.. तो मी नव्हेच अशा आशयाचे ट्विट भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

First Published on: February 24, 2021 1:15 PM
Exit mobile version