देशाला त्रास देत बदनाम करणाऱ्यांना भाजपा जास्त संधी देते, मंत्री अस्लम शेख यांचा आरोप

देशाला त्रास देत बदनाम करणाऱ्यांना भाजपा जास्त संधी देते, मंत्री अस्लम शेख यांचा आरोप

यंत्रमागधारकांची वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती; वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची माहिती

“आता ग्लोरीफाय करण्यासाठी राहिले काय? ज्या खासदारांवर दहशतवादाचे खटले सुरु आहेत ते जाऊन बसले आहेत निवडून आले आहेत. जे या देशाला जास्त त्रास देतात बदनाम करतात. त्या लोकांना जास्त संधी देण्याचे काम भारतीय जनता पार्टी करतेय. राज्य सरकारमध्ये असो की मग केंद्र सरकार .. हे जगजाहीर आहे.” असा आरोप मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख  (Mumbai Guardian Minister Aslam Shaikh) यांनी केला आहे.

“या देशात जर सांप्रदायिकीकरणाचे काम कोण करत असले तर ते भाजपा आणि केंद्र सरकार करत आहे. गोडसे तर एक लहानचं गोष्ट आहे, ‘पिक्चर अभी बाकी आहे. जस जशा निवडणुकी येणार तसं तुम्ही बघणार” अशी टीकाही मंत्री अस्लम शेख यांनी केली आहे.

‘कलाकाराला राजकारणाशी जोडणे योग्य नाही’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे लवकरच मोठ्या पडद्यावर नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहेत. पण त्यांच्या या चित्रपटावरुनच एक नवा वादाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी यावर विरोध दर्शवला आहे. यावरचं बोलताना मंत्री अस्लम शेख म्हणाले की, “कलाकार आपली कलाकारी त्याला भेटले त्या रोलवर करणार आहे. त्यांनी काय देवाचा रोल केला तर ते देव होऊन जात नाही. शेवटी ते कलाकारचं असतात. व्हिलन असू द्या, डान्सर असू द्या, कॉमेडीयन असून द्या, कलाकार कलाकार असतो. त्याला कुठे राजकारणाशी जोडणे योग्य नाही. देशांमधील काही लोकं आहेत त्यांचा उघडपणे विचार बदलल्याचे दिसतेय. तर भाजपाच्या बऱ्याच नेत्यांचा आणि मंत्र्यांचा विचार बदलेला दिसतोय. पण मला नाही वाटत तुमच्या लोकांचा किंवा आमच्या लोकांचा गोडसेबद्दल विचार बदलल्याचा दिसतोय.” असंही मंत्री अस्लम शेख म्हणाले.


 

First Published on: January 20, 2022 6:34 PM
Exit mobile version